भाजपच्या नेत्रतपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:21 IST2021-02-16T04:21:07+5:302021-02-16T04:21:07+5:30

श्रीरामपूर : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास मोठा ...

BJP's eye examination | भाजपच्या नेत्रतपासणी

भाजपच्या नेत्रतपासणी

श्रीरामपूर : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. यात गरजूंना चष्म्यांचे वाटप करण्यात आले. शस्त्रक्रियेची आवश्यकता असणा‌‌-या रुग्णांना पुणे येथे पाठविले जाणार आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, शहराध्यक्ष मारुती बिंगले यांनी उपक्रमाचे आयोजन केले. यावेळी शशिकांत कडूस्कर, राजेंद्र कांबळे, रामभाऊ तरस, अजित बाबेल, अरुण धर्माधिकारी, मिलिंदकुमार साळवे, बाळासाहेब अहिरे, अक्षय वर्पे, विशाल यादव आदी उपस्थित होते. पालिकेच्या आगाशे सभागृह येथे पार पडलेल्या शिबिरात तालुक्यातील नागरिकांनी सहभाग घेतला. पुणे येथील एच.व्ही. देसाई आय केअर रुग्णालयात गरजूंवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

यावेळी आनंद बुधेकर, रवी पंडित, किरण जगताप, रूपेश हरकल, ओंकार झिरंगे, अक्षय नागरे, अमोल अंबिलवादे आदी उपस्थित होते.

Web Title: BJP's eye examination