भाजपा निश्चीतपणे बहुमत सिद्ध करेल-राधाकृष्ण विखे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 18:40 IST2019-11-23T18:39:34+5:302019-11-23T18:40:12+5:30

जनतेने भाजपाला कौल दिला होता. त्यामुळे हे अपेक्षीतच होते. आम्ही निश्चितपणे बहुमत सिद्ध करू, असा विश्वास भाजपचे नेते राधाकृष्ण विखे यांनी शिर्डीत व्यक्त केला.

BJP will surely prove majority - Radhakrishna Vikhe | भाजपा निश्चीतपणे बहुमत सिद्ध करेल-राधाकृष्ण विखे 

भाजपा निश्चीतपणे बहुमत सिद्ध करेल-राधाकृष्ण विखे 

शिर्डी : जनतेने भाजपाला कौल दिला होता. त्यामुळे हे अपेक्षीतच होते. आम्ही निश्चितपणे बहुमत सिद्ध करू, असा विश्वास भाजपचे नेते राधाकृष्ण विखे यांनी शिर्डीत व्यक्त केला.
 राज्यात भाजपा पुन्हा सत्तारूढ झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी मुंबईला रवाना होण्यापूर्वी साईदरबारी हजेरी लावून साईबाबांचे दर्शन घेतले़. यानंतर विखे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळण आवश्यक होते. पण दुर्दैवाने तसे झाले नाही़. शिवसेनेला ज्या जागा मिळाल्या, त्या भाजपाच्या आधारामुळे मिळाल्या. राज्यात त्यांनी काय केले हे लोकांनी पाहिले. उद्याच्या काळात जनताच त्यांना उत्तर देईल, असे  ते म्हणाले़
राष्टवादीचे नेते अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला या  संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार विखे यांनी घेतला. खासदार संजय राऊत यांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही विखे यांनी त्यांना दिला. राष्ट्रवादीशी काही वैयक्तीक वाद नाही. त्यामुळे आम्ही सर्व जण मिळून राज्याच्या हिताचे काम करू, असेही विखे यांनी सांगितले़. 
 

Web Title: BJP will surely prove majority - Radhakrishna Vikhe