भाजप संचालन समितीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:21 IST2021-01-20T04:21:22+5:302021-01-20T04:21:22+5:30

श्रीरामपूर : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यात भाजप संचालन समितीचे ४० उमेदवार विजयी झाल्याचा दावा नगरसेवक किरण लुणिया ...

Of the BJP Steering Committee | भाजप संचालन समितीचा

भाजप संचालन समितीचा

श्रीरामपूर : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यात भाजप संचालन समितीचे ४० उमेदवार विजयी झाल्याचा दावा नगरसेवक किरण लुणिया यांनी केला आहे. याशिवाय दोन ग्रामपंचायतींवर पूर्ण बहुमत मिळविल्याचा दावा त्यांनी केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक पातळीवर युती करण्याचे व निवडणुका लढविण्याचे स्वातंत्र्य त्यांना देण्यात आले होते. २७ पैकी १८ ग्रामपंचायतींतील ४७ जागांवर भाजप संचालन समितीचे कार्यकर्ते निवडणूक रिंगणात होते. मातुलठाण, गोंडेगाव, ब्राम्हणगाव वेताळ, महांकाळवाडगाव, निपाणीवाडगाव, कारेगाव, लाडगाव, बेलापूर बुद्रुक, बेलापूर खुर्द, टाकळीभान, भोकर, उंबरगाव, मांडवे व पढेगाव या ठिकाणी ४० उमेदवार विजयी झाल्याचे लुणिया यांनी म्हटले आहे.

भाजप संचालन समितीचे कार्यकर्ते गेल्या वीस वर्षांपासून पक्षात सक्रिय आहेत. मोठ्या संघर्षानंतर त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्बत झाले आहे. त्यामुळे हे यश मोठा आनंदाचा क्षण आहे, असे लुणिया तसेच भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी म्हटले आहे.

Web Title: Of the BJP Steering Committee