उत्तर भारतीय आघाडीबाबत भाजपाची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:46 IST2021-09-02T04:46:01+5:302021-09-02T04:46:01+5:30
उत्तर भारतीय आघाडीसंदर्भात शिर्डी येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर शुक्ला यांनी नगरचा दौरा केला. यावेळी ते ...

उत्तर भारतीय आघाडीबाबत भाजपाची बैठक
उत्तर भारतीय आघाडीसंदर्भात शिर्डी येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर शुक्ला यांनी नगरचा दौरा केला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शुक्ला यांचा भाजपाचे जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग यांनी सत्कार केला. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उत्तर भारतीय आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष म्हणून विनय शुक्ला यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. यावेळी बोलताना भालसिंग म्हणाले, भाजपच्या जिल्ह्यातील सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन उत्तर भारतीय मोर्चाची व नगर दक्षिणेची कार्यकारिणीसंदर्भात जिल्हाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार प्रद्दून्म शुक्ला यांच्याशी चर्चा केली. यामध्ये नगर ग्रामीणमध्ये दरेवाडी, वाकोडी, सुपा, नगर दक्षिण या भागात मोठया प्रमाणात उत्तर भारतीय नागरिक स्थायिक झाले आहेत. त्यांना एकत्र करून जिल्हाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अध्यक्षांची लवकर नियुक्ती केली जाईल. यावेळी नवीन सिंग, बाबासाहेब जाधव, गणेश भालसिंग, बबन आव्हाड आदी उपस्थित होते.