शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणा-या भाजपच्या उपमहापौराला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 21:00 IST2018-02-16T20:57:44+5:302018-02-16T21:00:37+5:30
अहमदनगर महापानगरपालिकेचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. दिवसभरात आंदोलने, जनक्षोभ उसळल्यानंतर रात्री छिंदम याला सोलापूर रोडवरील दरेवाडी परिसरात पोलिसांनी अटक केली.

शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणा-या भाजपच्या उपमहापौराला अटक
अहमदनगर : अहमदनगर महापानगरपालिकेचे भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. दिवसभरात आंदोलने, जनक्षोभ उसळल्यानंतर रात्री छिंदम याला सोलापूर रोडवरील दरेवाडी परिसरात पोलिसांनी अटक केली.
शुक्रवारी रात्री पावणेनऊ वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला दरेवाडी परिसरातून ताब्यात घेतले. छिंदम याला अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी चार पथके तयार केली होती. या पथकांद्यारे छिंदम याचा शोध घेतला जात होता. छिंदम हा सोलापूर रोडवर दरेवाडी परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी छिंदम याला अटक केली. दरम्यान पोलिसांनी छिंदम याच्या अटकेची माहिती अत्यंत गुप्त ठेवली आहे. छिंदमच्या अटकेविषयी पोलीस काहीही माहिती देण्यास तयार नाहीत.