शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने चौंडीला राजकीय व्यासपीठ बनविले : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 19:57 IST

सत्ताधाऱ्यांनी ते जाणीवपूर्वक राजकीय व्यासपीठ केले आहे. त्यामुळे तेथे आरक्षण, घोषणा या दोन्ही गोष्टी घडणार आहेत. हे सर्व होणार हे मंत्री महोदयांनी (राम शिंदे) गृहीत धरले होते. डॉ. इंद्रकुमार भिसे यांना पोलिसांनी उचलून गाडीत घातले हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे

जामखेड : धनगर समाजाच्या आरक्षण मागणीचे केंद्र चौंडी आहे. सत्ताधाऱ्यांनी ते जाणीवपूर्वक राजकीय व्यासपीठ केले आहे. त्यामुळे तेथे आरक्षण, घोषणा या दोन्ही गोष्टी घडणार आहेत. हे सर्व होणार हे मंत्री महोदयांनी (राम शिंदे) गृहीत धरले होते. डॉ. इंद्रकुमार भिसे यांना पोलिसांनी उचलून गाडीत घातले हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. उच्च न्यायालयात भिसे यांच्या जामिनासाठी स्वतंत्र वकील देऊन त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमातील गोंधळ प्रकरणी जामखेड कारागृहात असलेले बहुजन एकता परिषदेचे अध्यक्ष डॉ. इंद्रकुमार भिसे यांची आंबेडकर यांनी गुरुवारी भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. धनगर आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करताना आंबेडकर म्हणाले, ८५ हजार आदिवासी बांधव जातपडताळणी प्रमाणपत्रापासून वंचित आहेत. यामध्ये धनगर समाजही आहे. म्हणून यासर्व वंचित आदिवासी संघटनांचा लढा राज्याबाहेर चालू आहे. याबाबत द्विधा मनस्थितीत सरकार आहे.संभाजी भिडे यांच्या मनुवादी विचाराविषयी बोलतांना आंबेडकर म्हणाले, भिडे यांनी संत तुकाराम, ज्ञानेश्वर यांच्यापेक्षा मनु श्रेष्ठ असल्याचे म्हटले. या वक्तव्यावरुन त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. याविषयी मुख्यमंत्र्यांचे विधानही गोलमाल आहे. आम्ही भिडे यांच्या विधानाशी सहमत नाही एवढे बोलून चालत नाही. ते स्वत: व्यक्तिगत मनुवादींपेक्षा संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांना महत्त्व देत असतील. या प्रकरणात ते भिडेंना पाठीशी घालत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरJamkhedजामखेड