शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
5
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
6
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
8
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
9
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
10
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
11
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
12
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
13
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
14
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
15
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
16
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
17
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
18
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
19
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
20
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

भाजप-कॉँग्रेस-राष्ट्रवादीची युती?

By admin | Updated: June 10, 2016 23:39 IST

अहमदनगर : उपमहापौर पदाचा तिढा सुटला नसतानाच सेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीचे प्रयत्न भाजपमधील गांधी गटाकडून सुरू झाल्याची माहिती हाती आली आहे.

अहमदनगर : उपमहापौर पदाचा तिढा सुटला नसतानाच सेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीचे प्रयत्न भाजपमधील गांधी गटाकडून सुरू झाल्याची माहिती हाती आली आहे. त्यासाठी राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडीची मदत घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने गांधी गटाने पुढाकार घेतला असून तशी राजकीय चाचपणी करण्यासाठी गांधी गटाच्या चार नगरसेवकांची बैठक पक्ष कार्यालयात शुक्रवारी पार पडली. नगरच्या राजकीय वर्तुळात तशी चर्चा दोन दिवसांपासून दबक्या आवाजात सुरू आहे. तिन्ही पक्षाच्या प्रमुख स्थानिक नेत्यांनी मात्र यावर भाष्य करण्यास नकार दिला. महापालिकेत सर्वाधिक राष्ट्रवादी शहर विकास आघाडीचे २१ नगरसेवक आहेत. त्याखालोखाल सेनेचे १९, कॉँग्रेस ११ तर भाजपचे ९ नगरसेवक आहेत. मनसे ४ आणि अन्य अपक्ष असे बलाबल महापालिकेत आहेत. सेनेचे १९ आणि भाजपचे ५ नगरसेवक तसेच आघाडी-मनसेचे काही नगरसेवक सेनेने सहलीवर रवाना केले आहेत. महापौर पदासाठीचे अपेक्षित संख्याबळ होत नसल्याने आघाडीत तशी सामसूम आहे. भाजपमधील नगरसेवक खासदार दिलीप गांधी व माजी शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर यांच्यात विभागले गेले आहेत. आगरकर गटाचे नगरसेवक सेनेने सहलीवर रवाना केले आहेत. गांधी गटाचे चार नगरसेवक नगरमध्येच आहेत. या नगरसेवकांची बैठक गांधी मैदानातील पक्ष कार्यालयात झाली. त्यात या अनोख्या युतीचा फॉर्म्युला मांडण्यात आला आहे. नंदा मनेष साठे, मालन ढोणे, श्रीपाद छिंदम, सुवेंद्र गांधी हे चार नगरसेवक तसेच पक्षाचे गौतम दीक्षित, किशोर बोरा, जगन्नाथ निंबाळकर, रवी बारस्कर आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी-कॉँग्रेस व भाजपची युती करून महापौर आणि उपमहापौर पद भाजपकडे घ्यायचा असा हा फॉर्म्युला आहे. तसे झाले तर नगरच्या राजकीय क्षेत्रात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विरोधात बसण्याची वेळ आलीच तर त्यापेक्षा भाजपसोबत सत्तेत बसण्यात आघाडीलाही हरकत नसल्याचे सूत्रांकडून समजते. नगरच्या राजकीय क्षेत्रात आघाडीचा खरा शत्रू हा सेना आहे. भाजपच्या मदतीने सेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यात आघाडीचेही भलेच आहे. खासदार दिलीप गांधी यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच पक्षाच्या नगरसेवकांची बैठक झाल्याचे दिक्षीत यांनी सांगितले. अभय आगरकर तसेच अन्य नगरसेवकांनाही निरोप दिले होते. मात्र ते घरगुती कारणामुळे बैठकीला उपस्थित नसल्याचे सांगत भाजपच्या गैरहजर नगरसेवकांचे दिक्षीत यांनी समर्थन केले. ‘शत प्रतिशत भाजप’ असा नारा देत या नगरसेवकांनी जे येतील त्यांच्यासोबत अन् न येतील त्यांच्याशिवाय असे स्पष्ट करत दिक्षीत यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली. दीक्षित यांच्या म्हणण्यानुसार आगरकर गटाचे नाही तर ते पक्षाचे नगरसेवक आहेत. त्यामुळे ते येतील. भाजपचाच महापौर अन् उपमहापौर होईल.(प्रतिनिधी)भोसलेही अनोख्या युतीच्या संपर्कातमनसेच्या चार नगरसेवकांपैकी तिघे नगरसेवक सेनेच्या कळपात दाखल झाले आहेत. गटनेते गणेश भोसले हे नगरमध्येच असून ते या अनोख्या युतीच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुवेंद्र गांधींना नकोय पदभाजपचे नगरसेवक व खासदार दिलीप गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी यांनी पक्षाच्या बैठकीत आपली भूमिका स्पष्ट केली. महापौर, उपमहापौर किंवा महापालिकेत कोणतेच पद मला नकोय. मला कोणत्याही पदाची लालसा नाही. प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे असे स्पष्ट करत सुवेंद्र गांधी यांनी सर्व पदे ही पक्षातील अन्य नगरसेवकांना दिली जातील असे स्पष्ट केल्याचे दिक्षीत यांनी सांगितले.