वाढदिवस साजरा केला अन् जेलमध्ये गेला; तलवारीने केक कापला म्हणून राहुरीत तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 15:19 IST2017-12-05T15:18:17+5:302017-12-05T15:19:26+5:30
तरुणाईमध्ये वाढदिवस साजरा करण्याचा उत्साह मोठा असतो. आपला वाढदिवस हटकेच झाला पाहिजे, यासाठी अनेकांचा हट्टहास असतो. असाच वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या तरुणांच्या हाती थेट पोलिसांच्या बेड्याच पडल्याचा प्रकार राहुरीत घडला.

वाढदिवस साजरा केला अन् जेलमध्ये गेला; तलवारीने केक कापला म्हणून राहुरीत तिघांना अटक
राहुरी : तरुणाईमध्ये वाढदिवस साजरा करण्याचा उत्साह मोठा असतो. आपला वाढदिवस हटकेच झाला पाहिजे, यासाठी अनेकांचा हट्टहास असतो. असाच वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या तरुणांच्या हाती थेट पोलिसांच्या बेड्याच पडल्याचा प्रकार राहुरीत घडला.
राहुरी तालुक्यातील गोटूंबा आखाडा येथील संदीप बाचकर याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सोमवारी रात्री एका हॉटेलमध्ये पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत तलवारीने केक कापून जल्लोष करण्यात आला. मात्र, तलवारीने केक कापणे या मित्रांच्या चांगलेच अंगलट आले आहे. तलवारीने केक कापल्याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. त्यावरुन पोलिसांनी मंगळवारी संदीप बाचकर (वय २४), दीपक शिंदे (वय २८), रवींद्र लबडे (वय २५) यांना पोलिसांनी अटक केली. पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश नेरकर यांच्या फिर्यादीवरुन राहुरी तालुका पोलीस ठाण्यात तिघा तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.