नगर अर्बन बँकेत तारण ठेवलेलं कोट्यवधी रुपयांचं सोन निघालं बनावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 14:38 IST2021-06-23T14:37:53+5:302021-06-23T14:38:28+5:30

अहमदनगर: नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत तारण ठेवलेल्या सोन्याची बुधवारी बँकेच्या नगर येथील मुख्य शाखेत लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. यावेळी पाच पिशव्यांमध्ये सोन्याऐवजी बेन्टेक्सचे दागिने निघाल्याने लिलाव प्रक्रियेत सहभागी झालेले सराफ निघून गेले.

Billions of rupees of gold pledged in Nagar Urban Bank turned out to be fake | नगर अर्बन बँकेत तारण ठेवलेलं कोट्यवधी रुपयांचं सोन निघालं बनावट

नगर अर्बन बँकेत तारण ठेवलेलं कोट्यवधी रुपयांचं सोन निघालं बनावट

अहमदनगर: नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत तारण ठेवलेल्या सोन्याची बुधवारी बँकेच्या नगर येथील मुख्य शाखेत लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. यावेळी पाच पिशव्यांमध्ये सोन्याऐवजी बेन्टेक्सचे दागिने निघाल्याने लिलाव प्रक्रियेत सहभागी झालेले सराफ निघून गेले.

लिलाव बाकी असलेले उर्वरित कोट्यावधी रुपयांचे सोनेही बनावट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बुधवारी लिलावासाठी 364 पिशव्या आणण्यात आल्या होत्या. तारण ठेवलेल्या या सोन्यावर बँकेने कोट्यवधी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. प्रत्यक्षात मात्र बनावट सोन्याच्या माध्यमातून कर्ज वितरित झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अर्बन बँकेत कोट्यवधी रुपयांचा सोनेतारण अपहार समोर आला आहेत. दरम्यान तारण असलेल्या सर्व सोन्याचा पंचनामा करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे बँकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान अर्बन बँकेतील कर्ज वितरणातील अनियमितता, वसुली ऑडिट रिपोर्ट आदी संदर्भात बँकेचे सभासद राजेंद्र गांधी, पोपोट लोढा, भैरवनाथ वाकळे, अनिल गट्टाणी यांनी बँकेचे प्रशासक महेंद्रकुमार रेखी यांना जाब विचारला त्यांनी मात्र सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे न देता ते कार्यालयातून निघून गेले. यावेळी सभासदांनी तीव्र संताप व्यक्त केला.

Web Title: Billions of rupees of gold pledged in Nagar Urban Bank turned out to be fake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.