बजरंग बली की जय...

By Admin | Updated: April 23, 2016 00:57 IST2016-04-23T00:32:35+5:302016-04-23T00:57:30+5:30

शिर्डी : साईनगरीतील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला़

Bijarang Bali Ki Jai ... | बजरंग बली की जय...

बजरंग बली की जय...

शिर्डी : साईनगरीतील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला़ जयंतीनिमित्त आयोजित हनुमान गोटा उचण्याच्या स्पर्धेत १५ भाविकांनी १२५ किलोचा गोटा उचलून स्पर्धा जिंकली़
साईबाबांनी सुरू केलेल्या रामनवमीला जशी १०५ वर्षांची परंपरा आहे़ तशीच शिर्डीतील हनुमान जयंतीलाही आहे़ साईबाबांचे वास्तव्य घडलेल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आजही ही जयंती मोठ्या उत्साहाने व भक्तिभावात साजरी झाली. गोटा उचलण्याच्या स्पर्धेत पन्नास भक्तांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे उद्घाटन विलास कोते, भाऊ भोसले, डॉ़ कथले, नारायण थोरात, दीपक वारुळे, प्रमोद गोंदकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमासाठी सचिन तांबे, संदीप रोकडे, सुरेंद्र महाले, महेश वैद्य, सागर सोपारकर, आकाश त्रिपाठी, विनोद प्रेमामी, नरेश सुराणा, बबलु वर्पे, शुभम अग्रवाल, अरुण हजारे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Bijarang Bali Ki Jai ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.