नगर मध्ये स्टील इंडस्ट्रीला सर्वाधिक फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:21 IST2020-12-31T04:21:03+5:302020-12-31T04:21:03+5:30
शासनाने मराठवाडा विदर्भातील उद्योजकांना वीज बिलात काही सवलत दिलेली आहे. ही सवलत नगर जिल्ह्यातील उद्योजकांना मिळालेली नाही. नगर जिल्ह्यामध्ये ...

नगर मध्ये स्टील इंडस्ट्रीला सर्वाधिक फटका
शासनाने मराठवाडा विदर्भातील उद्योजकांना वीज बिलात काही सवलत दिलेली आहे. ही सवलत नगर जिल्ह्यातील उद्योजकांना मिळालेली नाही. नगर जिल्ह्यामध्ये स्टील कारखान्यांची संख्या मोठी आहे. तसेच थोडे फार काही मोठे उद्योग आहेत. या उद्योगांना मोठ्या प्रमाणात वीज लागते. प्रतियुनिट मागे एक ते दिड रुपयांचा फरक पडतो. त्यामुळे शासनाने नव्याने वाढविलेल्या वीज वाढीमुळे जवळपास २० टक्के बिल जास्त भरावे लागते. वीज दर वाढल्याने उत्पादनाचा खर्च वाढला. हा खर्च वाढल्यामुळे उत्पादित केलेल्या मालाची किंमत वाढली. इतर जिल्ह्यातील कारखान्यांनाकडून हीच वस्तू कमी दरात विकली जाते. कारण त्यांना कमी वीज बिल आकारले जाते. विजेचे दर जास्त असल्याने उत्पादन खर्च वाढून वस्तूंच्या किमती वाढल्या. त्यामुळे या वाढलेल्या किमतीमुळे छोट्या उद्योजकांना ही मोठा फटका बसला आहे.