घरासमोर अचानक पडला मोठा खड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 20:46 IST2019-07-16T20:45:48+5:302019-07-16T20:46:10+5:30
राहुरी तालुक्यातील कात्रड गावातील अरुण पाडुरंग लोखंडे यांच्या घरासमोरच तुळशी वृंदावनालगत सोमवारी सायंकाळी अचानक मोठा खड्डा पडल्याची घटना घडली.

घरासमोर अचानक पडला मोठा खड्डा
वांबोरी/ब्राह्मणी : राहुरी तालुक्यातील कात्रड गावातील अरुण पाडुरंग लोखंडे यांच्या घरासमोरच तुळशी वृंदावनालगत सोमवारी सायंकाळी अचानक मोठा खड्डा पडल्याची घटना घडली.
घरातील महिला झाडलोट करीत असताना अचानक पेव्हिंग ब्लॉक खाली गेला. क्षणात आवाज झाल्याने त्या जागी सुमारे २० फूट मोठा खड्डा पडला. सदर घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच लोखंडे यांच्या घरासमोर तो खड्डा पाहण्यासाठी बघ्यांची एकच गर्दी झाली. कामगार तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील आदिनाथ घुगरकर, पोलीस कर्मचारी शैलेश सरोदे, रोहित पालवे यांनी घटनास्थळी पाहणी केली. मात्र, एवढा मोठा अचानक पडलेला खड्डा पाहून त्याचे कारण शोधण्यासाठी मंगळवारी उशिरापर्यत संबधित यंत्रणा फिरकली नाही. यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सदर खड्डा बुजवून टाकण्याचा लोखंडे यांचा मानस होता. मात्र, ग्रामस्थांनी त्यांना तो बुजवून दिला नाही. सदर यंत्रणेने पाहणी करून नेमकी कारण स्पष्ट करावे, अशी मागणी आहे.