नीलेश लंकेंना राष्ट्रवादीकडून लवकरच मोठी संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:21 IST2021-09-19T04:21:41+5:302021-09-19T04:21:41+5:30

अहमदनगर : कोरोनाच्या काळात सर्व रूग्णालये फुल्ल असताना आमदार नीलेश लंके यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाने कोविड ...

Big opportunity for Nilesh Lanka from NCP soon | नीलेश लंकेंना राष्ट्रवादीकडून लवकरच मोठी संधी

नीलेश लंकेंना राष्ट्रवादीकडून लवकरच मोठी संधी

अहमदनगर : कोरोनाच्या काळात सर्व रूग्णालये फुल्ल असताना आमदार नीलेश लंके यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाने कोविड रुग्णालय सुरू केले. यातून हजारो लोकांचे प्राण वाचविले. अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचविले. यामुळे लंके त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे. त्यांना राष्ट्रवादीच्या माध्यमातून लवकरच मोठी संधी मिळणार आहे, असे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले.

वडगाव गुप्ता (ता. नगर) येथील सीना नदीवरील पुलाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार नीलेश लंके, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, सरपंच विजय शेवाळे, बाबासाहेब गव्हाणे, सचिन गवारे, गुलाब शिंदे, सुदाम सातपुते, बाबा शेवाळे, राजेंद्र ढेपे, गोरख सातपुते, घनश्याम म्हस्के, संजय जपकर, शिवाजी होळकर आदी उपस्थित होते.

मिटकरी म्हणाले, कोरोनामुळे अर्थ व्यवस्था ढासळली असतानाही नीलेश लंके यांनी पारनेर-नगर मतदारसंघात शंभर कोटी रुपयांच्या निधीची कामे आणली. त्यांच्या कामाची पद्धतच अशी आहे की त्यांची कोणीही बरोबरी करू नये.

लंके म्हणाले, कोरोनाची महामारी असतानाही वडगाव गुप्ता येथे पाच कोटींची कामे मंजूर केली. विकासाची काम चालू केली आहेत. विकास कामाबाबत नगर तालुक्यातील सर्व रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. या निवडणुकीत पूर्ण लक्ष देणार आहे.

यावेळी मच्छिंद्र डोंगरे, बाबा शेळके, लखन डोंगरे, बाळू कोऱ्हाळे, गोवर्धन शेवाळे, संतोष गवारे, अमित चौधरी, मोहन गिते, संजय ढेपे, सदाशिव शिंदे, विनोद ठुबे, विकास जगताप, आनंदा कळमकर, सुभाष गव्हाणे, मंगल गोरे, संतोष निमसे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

----

१८ निलेश लंके

वडगाव गुप्ता येथे सीना नदीवरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन प्रसंगी आमदार अमोल मिटकरी, नीलेश लंके व इतर.

Web Title: Big opportunity for Nilesh Lanka from NCP soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.