अळकुटीत सव्वा काेटींच्या कामांचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:25 IST2021-08-21T04:25:27+5:302021-08-21T04:25:27+5:30

अळकुटी : पारनेर तालुक्यातील अळकुटी येथे १ कोटी २७ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व काही कामांचे लोकार्पण माजी ...

Bhumipujan of the works of Savva Kati in Alkuti | अळकुटीत सव्वा काेटींच्या कामांचे भूमिपूजन

अळकुटीत सव्वा काेटींच्या कामांचे भूमिपूजन

अळकुटी : पारनेर तालुक्यातील अळकुटी येथे १ कोटी २७ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व काही कामांचे लोकार्पण माजी विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांच्या हस्ते नुकतेच झाले.

अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते होते.

यावेळी पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे, तालुकाप्रमुख विकास रोहोकले, युवासेना तालुकाप्रमुख नितीन शेळके, माजी पंचायत समिती सदस्य डॉ. भास्कर शिरोळे, विभागप्रमुख सखाराम उजघरे, दत्ता भोसले, संतोष येवले, अळकुटीच्या सरपंच डॉ. कोमल भंडारी, उपसरपंच शरद घोलप, गारखिंडीचे सरपंच निवृत्ती चौधरी, संजय मते, रखमाजी कापसे, खंडू म्हस्के, बाबुराव म्हस्के, ग्रामसेवक बाळासाहेब दावभट, वडनेर बुद्रूकचे सरपंच पांडुरंग येवले, लोणी मावळाचे सरपंच गणेश मापारी, ग्रा.पं. सदस्य अरिफ पटेल, बाळासाहेब धोत्रे, किरण शिंदे, मीराबाई शिरोळे, लताबाई घोलप, सारिका शिरोळे, विकास भंडारी, अशोक शिरोळे, महिला आघाडीप्रमुख उज्ज्वला ढुमणे, संपत जाधव, संजय ठुबे, बाळासाहेब ठुबे, बाजीराव शिरोळे, रामदास भंडारी, नितीन परंडवाल, बाळासाहेब भंडारी, शिवाजी जाधव, प्रकाश शिरोळे, प्रवीण घोलप, सखाराम भंडारी, विठ्ठल भंडारी, रामदास शिरोळे, बाळासाहेब शिरोळे, बाबूनाना शिरोळे, भाऊसाहेब शिरोळे, संदीप भंडारी, नील भंडारी, साहेबराव पानमंद, आनंद शिरोळे, बंडू घोलप, जालिंदर घोलप, कैलास शिंदे, गौतम घोलप, लघुपाटबंधारे उपअभियंता सांगळे रावसाहेब आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक डॉ. कोमल भंडारी यांनी केले. सूत्रसंचालन भगवान शिंदे यांनी केले. रतन परंडवाल यांनी आभार मानले. (वा. प्र.)

-----

२० अळकुटी

Web Title: Bhumipujan of the works of Savva Kati in Alkuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.