छत्रपती संभाजी विद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन
By | Updated: December 9, 2020 04:15 IST2020-12-09T04:15:52+5:302020-12-09T04:15:52+5:30
यावेळी नागवडे म्हणाले, ग्रामीण भागातील शिक्षणाची गैरसोय ओळखून स्व. बापूंनी शैक्षणिक संस्थांचे जाळे निर्माण केले. विद्यालये, महाविद्यालये, राज्याच्या ग्रामीण ...

छत्रपती संभाजी विद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन
यावेळी नागवडे म्हणाले, ग्रामीण भागातील शिक्षणाची गैरसोय ओळखून स्व. बापूंनी शैक्षणिक संस्थांचे जाळे निर्माण केले. विद्यालये, महाविद्यालये, राज्याच्या ग्रामीण भागातील पहिले पाॅलिटेक्निक सुरू केले. या संस्थांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कित्येक विद्यार्थ्यांचे जीवन घडले. स्व.बापूंनी शैक्षणिक कार्याचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, संस्थेचे विश्वस्त राजकुमार पाटील, अरुणराव पाचपुते, शिवाजी जगताप, प्रा. सुनील माने, ॲड. सुनील भोस, राकेश पाचपुते, विजय कापसे, ॲड. अशोकराव रोडे, ज्येष्ठ नेते बाबासाहेब इथापे, सरपंच सुलोचना कणसे, उपसरपंच देवीदास शिर्के, प्रशांत ओगले, माजी उपसभापती प्रतिभा झिटे, इरफान पिरजादे, बशीरभाई काझी,बाळासाहेब नवले, कांतीलाल खेडकर, गणपतराव शिर्के, संस्थेचे निरीक्षक सचिन लगड, ज्ञानदेव आधोरे, नारायण कणसे, मुख्याध्यापक पद्माकर पंडित आदी उपस्थित होते.
....
फोटो-०८पेडगाव शाळा
....
ओळी- पेडगाव येथील श्री छत्रपती संभाजी विद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन करताना ''नागवडे'' कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे.