तीन तासांत भुईकोट झाला स्वच्छ
By Admin | Updated: February 21, 2017 12:26 IST2017-02-21T12:26:01+5:302017-02-21T12:26:01+5:30
जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसादत देत शालेय विद्यार्थ्यांस नागरकरांनीही हातात झाडू घेत अवघ्या अडिच ते तीन तासांत ऐतिहासिक भुईकोट किल्ला स्वच्छ केला़.

तीन तासांत भुईकोट झाला स्वच्छ
ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. २१ - जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसादत देत शालेय विद्यार्थ्यांस नगरकरांनीही हातात झाडू घेत अवघ्या अडिच ते तीन तासांत ऐतिहासिक भुईकोट किल्ला स्वच्छ केला़. सोमवारी सकाळी सात ते दहा या वेळेत राबविलेले हे स्वच्छता अभियान ऐतिहासिक ठरले़ सात हजार जणांनी या अभियानात सहभागी होत आपले योगदान दिले़ शाळा, महाविद्यालये, प्रशासकीय कार्यालये, पोलीस, सामाजिक संस्थांसह विविध मित्रमंडळे असे ५९ अस्थापनांमधील अधिकारी व कर्मचारी या अभियानात सहभागी झाले होते़.
‘नगरकरांच्या सहभागातून स्वच्छता’ ही संकल्पना घेत जिल्हा प्रशासनाच्यावतीने भुईकोट किल्ल्यात सोमवारी स्वच्छता राबविले़
जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या उपस्थित अभियनाला प्रारंभ झाला़ सकाळी सात वाजता हातात झाडू व टोपली घेऊन शालेय विद्यार्थी थेट भुईकोट किल्यात दाखल झाले़ शहरातील सर्वच शाळा, महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांनी किल्याचे विस्तीर्ण मैदान व्यापून टाकले होते़ शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनीही हातात झाडू घेत स्वच्छता केली़ घनदाट झाडींनी व्यापलेल्या भुईकोट किल्यातील केरकचरा, गवत, प्लास्टिक, मोठे दगड काही मिनिटातच दिशेनाशे झाल सात हजार जणांच्या सहभागातून किल्याचा साडेतीनशे ते चारशे एकरांचा परिसरत पूर्णत: स्वच्छ झाला. अभियानात सहभागी झालेल्या शाळामहाविद्यालयांसह संस्था व मंडळांच्या प्रतिनिधींचा जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला़
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी कवडे म्हणाले स्वच्छता अभियानात नगरकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत ऐतिहासिक वास्तुंविषयी आपली आत्मियता दाखवून दिली आहे़ या अभियानाची ही सुरूवात आहे़ येणाऱ्या काळातही असे अभियान राबविण्यात येतील़ अभियानात वनविभागाच्या उपवसरंक्षक ए़ श्रीलक्ष्मी, सामाजिक वनिकरणचे उपसंचालक चंद्रकांत तांबे, हरियाली संस्थेचे अध्यक्ष सुरेश खामकर, प्रेसक्लबचे अध्यक्ष मन्सुर शेख, उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, पोलीस उपाधीक्षक चिन्मय पंडित यांच्यासह प्रशासनाने नेमलेले स्वच्छता दूत व विविध विभागातील अधिकारी सहभागी झाले होते़.