भाऊसाहेब थोरात समाज विकासासाठी झटणारे प्रयोगशील ऋषी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:21 IST2021-03-16T04:21:09+5:302021-03-16T04:21:09+5:30

संगमनेर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारातून पारदर्शकता, आर्थिक शिस्त, दूरदृष्टी ही मूलतत्त्वे दिली. त्यांनी आयुष्यभर आदर्श तत्त्वांची ...

Bhausaheb Thorat is an experimental sage who strives for social development | भाऊसाहेब थोरात समाज विकासासाठी झटणारे प्रयोगशील ऋषी

भाऊसाहेब थोरात समाज विकासासाठी झटणारे प्रयोगशील ऋषी

संगमनेर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारातून पारदर्शकता, आर्थिक शिस्त, दूरदृष्टी ही मूलतत्त्वे दिली. त्यांनी आयुष्यभर आदर्श तत्त्वांची जोपासना केली. त्यांच्या व्यक्तिमत्वातील पारदर्शकता व औदार्य यामुळे त्यांच्या प्रसन्न चेहऱ्यावर कायम तेज राहिले. दिवंगत भाऊसाहेब थोरात हे समाजाच्या विकासासाठी आयुष्यभर झटणारे प्रयोगशील ऋषी होते, असे अर्थशास्त्रज्ञ डॉ.भालचंद्र मुणगेकर म्हणाले.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यावरील प्रेरणास्थळ येथे रविवारी (दि.१४) भाऊसाहेब थोरात यांच्या अकराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात डॉ. मुणगेेकर बोलत होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, दुर्गा तांबे, रणजितसिंह देशमुख, अ‍ॅड. माधवराव कानवडे, शिवाजीराव थोरात, कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, अमित पंडित, रामहरी कातोरे, मिरा शेटे, सुनंदा जोर्वेकर, गणपतराव सांगळे, शंकर खेमनर, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब डांगरे आदी उपस्थित होते.

डॉ.मुणगेकर म्हणाले, संगमनेर तालुका हा दुष्काळी तालुका होता. मात्र भाऊसाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीतून हा तालुका विकासाचे मॉडेल झाला आहे. आयुष्याची एकूण ६९ वर्षे त्यांनी समाज विकासासाठी वाहिली. वयाच्या १८ व्या वर्षी स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगला. त्यानंतर सहकाराच्या माध्यमातून या तालुक्याच्या विकासाचे रूप पालटले. पारदर्शकता, आर्थिक शिस्त, दुरदृष्टी ही त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट होते. त्यांचाच वारसा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी समर्थपणे पुढे चालवत आहेत, असे ते म्हणाले.

याप्रसंगी विश्वासराव मुर्तडक, निर्मला गुंजाळ, अर्चना बालोडे, सुनीता अभंग, आर. बी. रहाणे, मीनानाथ पांडे, सुरेश थोरात, नवनाथ आंधळे, विष्णुपंत राहटळ, भारत मुंगसे, किशोर टोकसे, चंद्रकांत कडलग, दत्तात्रय खुळे, प्रा. बाबा खरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक महसूलमंत्री थोरात यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले.

Web Title: Bhausaheb Thorat is an experimental sage who strives for social development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.