भाऊसाहेब हासे यास तीन दिवसांची कोठडी
By Admin | Updated: August 26, 2014 23:22 IST2014-08-26T23:14:41+5:302014-08-26T23:22:20+5:30
संगमनेर : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अंगावर शाईफेक करणारा आरोपी भाऊसाहेब हासे यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

भाऊसाहेब हासे यास तीन दिवसांची कोठडी
संगमनेर : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अंगावर शाईफेक करणारा युवा सेनेचा तालुकाध्यक्ष आरोपी भाऊसाहेब हासे यास बुधवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
२३ आॅगस्ट रोजी तालुक्यातील राजापूर गावातील एका कार्यक्रमात थोरात आले असता, गाडीत बसत असताना त्यांच्या अंगावर हासे याने शाई फेकली होती.
दरम्यान हासे याला काँग्रेस कार्यकर्त्यांनी पकडून बेदम चोप दिला. या मारहाणीत तो जखमी झाल्याने त्यास नगरच्या जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
उपचारानंतर दोन दिवसांनी शहर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याविरूध्द शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी हासे यास न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची कोठडी देण्यात आली. न्यायालयाच्या आवारात शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)