भाजपाच्या नेवासा तालुकाध्यक्षपदी भाऊसाहेब फुलारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:16 IST2021-07-20T04:16:23+5:302021-07-20T04:16:23+5:30
नेवासा : तालुक्यातील भेंडा येथील भाऊसाहेब गणपत फुलारी यांची भाजपाच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर ...

भाजपाच्या नेवासा तालुकाध्यक्षपदी भाऊसाहेब फुलारी
नेवासा : तालुक्यातील भेंडा येथील भाऊसाहेब गणपत फुलारी यांची भाजपाच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी नेवासा तालुका भाजपच्या ७८ पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारिणी नियुक्ती जाहीर केली आहे.
तालुकाध्यक्ष- भाऊसाहेब फुलारी, उपाध्यक्ष- दादासाहेब बर्डे, पाराजी गुदाडे, दादासाहेब कोकणे, सोपान कर्डिले, सुरेश डिके, किरण जावळे, प्रमोद पेहरे, महेंद्र आगळे, सरचिटणीसपदी वसंतराव उकिर्डे, अमोल कोलते, चिटणीसपदी- महेश नवले, पोपट शेडगे, संभाजी काजळे, रावसाहेब होन, नानासाहेब ढेरे, सुखदेव कदम, अशोक आयनर, कल्याण मते, कोषाध्यक्षपदी तुळशीराम शिंदे, प्रसिद्धी प्रमुखपदी रितेश भंडारी, कार्यालयीन चिटणीसपदी संदीप आदमने, किसान मोर्चा प्रमुखपदी ऋषिकेश शेटे, उद्योग सेल प्रमुखपदी मुकुंद हारदे, अल्पसंख्यांक मोर्चा प्रमुखपदी राजू शेख, अनुसूचित जमाती मोर्चा प्रमुखपदी येडूभाऊ सोनवणे, अनुसूचित जमाती मोर्चा प्रमुखपदी प्रकाश धनवटे, वैद्यकीय सेल उद्योग सेल प्रमुखपदी डॉ. लक्ष्मण खंडाळे, दिव्यांग सेल प्रमुखपदी वैजिनाथ जाधव, माजी सैनिक सेल प्रमुखपदी बाबासाहेब टेमक, युवा मोर्चा प्रमुखपदी प्रताप चिंधे, कायदा सेल प्रमुखपदी किशोर सांगळे, सोशल मीडिया आदिनाथ पटारे, नमामी गंगे प्रकल्प प्रमुख एकनाथ जाधव, सहकार सेल प्रमुख तुळशीराम काळे, ज्येष्ठ कार्यकर्ता सेल प्रमुख भाऊसाहेब माणिक भागवत, वाहतूक सेल प्रमुख संजय नारळे, नेवासा शहर प्रमुख मनोज पारखे, शहर अनुसूचित जमाती प्रमुख रोहित पवार, शहर युवा मोर्चा प्रमुख प्रतीक शेजूळ.
नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा, जिल्हा चिटणीस अंकुशराव काळे यांनी स्वागत केले.