पाथर्डीत भरदुपारी अडीच लाखांचा ऐवज चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:26 IST2021-07-07T04:26:26+5:302021-07-07T04:26:26+5:30
पाथर्डी : शहरातील वामनभाऊ उपनगरातील पसायदान कॉलनीतून रविवारी भरदुपारी एकच्या सुमारास झालेल्या घरफोडीत रोकड व सोन्याचे दागिने असा अडीच ...

पाथर्डीत भरदुपारी अडीच लाखांचा ऐवज चोरीला
पाथर्डी : शहरातील वामनभाऊ उपनगरातील पसायदान कॉलनीतून रविवारी भरदुपारी एकच्या सुमारास झालेल्या घरफोडीत रोकड व सोन्याचे दागिने असा अडीच लाखांचा ऐवज चोरट्यांनी
लंपास केला. वामनभाऊ नगर येथील पसायदान कॉलनीतील प्राथमिक शिक्षक ज्ञानेश्वर बाजीराव गर्जे यांच्या घरी हा चोरीचा प्रकार झाला. गर्जे हे सुटीमुळे गावी येळी येथे गेले होते. नेमके हेच हेरून चोरट्यांनी दुपारी एकच्या सुमारास घराचा पाठीमागचा दरवाजा तोडून कपाटातील साहित्याची उचकापाचक केली. नव्वद हजारांची रोकड तसेच सोन्याचे गंठण, कानातील फुलांचे दोन जोड, दीड तोळ्याच्या तीन अंगठ्या असे ४.५ तोळे सोने असा एकूण अडीच लाखांचा ऐवज लांबविला.
घटना ठिकाणच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात दाेन संशयित इसम क्रमांक नसलेल्या काळ्या रंगाच्या दुचाकीवर घराच्या भोवती फिरताना आढळून आले असून पोलीस त्याबाबत तपास करत आहेत. कोरोनामुळे आर्थिक संकटात असताना शहरात भरदुपारी मोठमोठ्या चोऱ्या होऊ लागल्याने तसेच यापूर्वी झालेल्या चोऱ्यांचा तपास लागत नसल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे व चिंतेचे वातावरण आहे.
----
०५ पाथर्डी चोरी
पाथर्डी येथे ज्ञानेश्वर गर्जे यांच्या घरी चोरांनी साहित्याची केलेली उचकापाचक.
050721\img20210704175452.jpg
फोटो - पाथर्डी शहरातील वामनभाऊ उपनगरातील पसायदान कॉलनीतून रविवारी भरदुपारी १ वाजण्याच्या सुमारास झालेल्या घरफोडीत सुमारे रोकड व सोन्याचे दागिने असा अडीच लाखाचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेहला आहे.