कोपरगावात व्यावसायिकांकडून भारत बंदला प्रतिसाद

By | Updated: December 9, 2020 04:16 IST2020-12-09T04:16:09+5:302020-12-09T04:16:09+5:30

कोपरगाव : केंद्रातील भाजप सरकारने नव्याने केलेले कृषी कायदे तातडीने मागे घ्यावेत, या मागणीसाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनकर्त्यांनी मंगळवारी ...

Bharat Bandla response from traders in Kopargaon | कोपरगावात व्यावसायिकांकडून भारत बंदला प्रतिसाद

कोपरगावात व्यावसायिकांकडून भारत बंदला प्रतिसाद

कोपरगाव : केंद्रातील भाजप सरकारने नव्याने केलेले कृषी कायदे तातडीने मागे घ्यावेत, या मागणीसाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनकर्त्यांनी मंगळवारी (दि.८) भारत बंदला कोपरगावातील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दर्शवीत दुकाने बंद ठेऊन बंद पाळला.

या बंदमध्ये सहभागी होण्यासाठी कोपरगाव शहरातील व्यापाऱ्यांनी मंगळवारी सकाळपासूनच शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद ठेवली होती. नेहमीच गजबजलेली बाजारपेठ, शहरातील रस्त्यांवर दिवसभर शांतता होती. कोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. त्यानंतर कोपरगाव शहरातील महात्मा गांधी पुतळा येथे धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तहसीलदार योगेश चंद्रे यांना महविकास आघाडीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

...........................

फोटो०८- कोपरगाव बंद

081220\img_20201208_113603.jpg

कोपरगाव शहरात व्यापाऱ्यांनी मंगळवारी भारत बंदला प्रतिसाद दर्शविला ( छाया: रोहित टेके) 

Web Title: Bharat Bandla response from traders in Kopargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.