राहात्यात शेतकरी आंदोलनास भारत बंदला प्रतिसाद
By | Updated: December 9, 2020 04:16 IST2020-12-09T04:16:14+5:302020-12-09T04:16:14+5:30
राहाता शहरात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष मनसे व शेतकरी, व्यापाऱ्यांच्या वतीने राहाता शहरात बंद ...

राहात्यात शेतकरी आंदोलनास भारत बंदला प्रतिसाद
राहाता शहरात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष मनसे व शेतकरी, व्यापाऱ्यांच्या वतीने राहाता शहरात बंद उत्स्फूर्तपणे पाळण्यात आला.
राहाता बाजार तळावर वीरभद्र महाराज मंदिरासमोरील प्रांगणात झालेल्या बैठकीत नवीन कृषीविषयक कायदे, कामगारविरोधी कायदे व संशोधित वीज कायदे रद्द करावे, मागे घ्यावे, या मागणीचे निवेदन राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांना दिले आहे.
याप्रसंगी शिवसेना नेते व राहाता नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत लोळगे, राष्ट्रीय काँग्रेस महिला आघाडीच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्ष लताताई डांगे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रावसाहेब बोठे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकुमार सदाफळ, भारतीय किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड प्रा. एल. एम. डांगे, श्रमिक शेतकरी संघटनेचे नेते काॅम्रेड राजेंद्र बावके, माजी नगरसेवक राजेंद्र अग्रवाल, वीरभद्र देवस्थानचे माजी अध्यक्ष भागुनाथ गाडेकर, राष्ट्रीय जनमंच पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गिधाड, सामाजिक कार्यकर्ते रामनाथ सदाफळ, नगरसेवक सागर लुटे, ॲड ऋषिकेश करमासे, सुवर्णकार संघटनेचे शहराध्यक्ष प्रशांत मुंडलिक, काँग्रेसचे सार्थक करमासे, तालुका सलून असोसिएशनचे अनिकेत तुपे, राष्ट्रवादीचे रणजित बोठे, युवासेनेचे भागवत लांडगे, सुलेमान शेख, विक्रांत दडवते उपस्थित होते.