शहरातील गर्दी टाळण्यासाठी भरारी पथक तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:25 IST2021-02-25T04:25:24+5:302021-02-25T04:25:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी ...

Bharari squad deployed to avoid crowds in the city | शहरातील गर्दी टाळण्यासाठी भरारी पथक तैनात

शहरातील गर्दी टाळण्यासाठी भरारी पथक तैनात

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी महापालिकेने प्रभागनिहाय भरारी पथक स्थापन केले आहे.

नगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेकडून कडक पावले उचलण्यात येत आहेत. नागरिकांकडून मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे महापालिकेने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेने सावेडी, शहर, केडगाव आणि झेंडीगेट प्रभाग कार्यालय अंतर्गत भरारी पथक स्थापन केले आहे. या पथकामध्ये एकूण २५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे कर्मचारी शहरातील गर्दी रोखण्याचे काम करणार आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार नागरिकांवर कारवाई केली जाणार आहे.

....

असे आहेत पथक

सावेडी प्रभाग- सुनील खलसे, अमित मिसाळ, अंबादास गोंटला, शिवाजी सुरवसे, राजेंद्र जाधव, विष्णू देशमुख, देविदास बिजा.

...

शहर प्रभाग- गणेश वरुटे, भीमराज कानगुडे ,राजेंद्र बोरुडे, नंदू रोखले, पोपट वायाळ, शुभम उपलनची

झेंडीगेट- गणेश धाडगे,मोहम्मद सय्यद, डी.डी. भाकरे, इरफान सय्यद, अनिल कोकनी, दीपक सोनवणे,

केडगाव- अनिल लोंढे, भीमराज कोतकर, गणेश जाधव, तुळशीराम जगधने,बबन करांडे, संजय लोंढे.

--

फोटो आहे

Web Title: Bharari squad deployed to avoid crowds in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.