भापकर गुरुजींवर हल्ला

By Admin | Updated: May 13, 2017 14:09 IST2017-05-13T14:09:41+5:302017-05-13T14:09:41+5:30

नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्राचे मांझी राजाराम भापकर गुरुजी यांना गावातील काही मद्यपींनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला़

Bhapkar's attack on Guruji | भापकर गुरुजींवर हल्ला

भापकर गुरुजींवर हल्ला

आॅनलाईन लोकमत
अहमदनगर, दि़ १३ - नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्राचे मांझी राजाराम भापकर गुरुजी यांना गावातील काही मद्यपींनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला़
भापकर गुरुजी गावात दारुबंदीसाठी आग्रही आहेत़ मात्र, गुंडेगाव येथे शुक्रवारी रात्री बहिरोबा यात्रोत्सवानिमित्त गावात काही तरुण दारु पिवून धिंगाणा घालीत होते़ भापकर गुरुजी यांनी या तरुणांना दारु न पिण्याबाबत सांगितल्याचा राग आल्यामुळे या तरुणांनी गुरुजींना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली़ याबाबत भापकर गुरुजी यांनी शनिवारी दुपारी नगर तालुका पोलीस ठाण्यात संबंधित तरुणांविरोधात तक्रार दिली आहे़

Web Title: Bhapkar's attack on Guruji