भांड यांना टाटा उद्योग विभूषण पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:16 IST2021-07-20T04:16:22+5:302021-07-20T04:16:22+5:30
राहुरी : राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांना महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेच्यावतीने ...

भांड यांना टाटा उद्योग विभूषण पुरस्कार
राहुरी : राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांना महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेच्यावतीने भारतरत्न जे. आर. डी उद्योग विभूषण पुरस्काराने महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संगमनेर येथे प्रदान करण्यात आला.
उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद पुणे यांच्यावतीने संगमनेर येथे शनिवारी मालपाणी लॉन्समध्ये उद्योजक गिरीश मालपाणी यांचे अध्यक्षतेखाली व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे हस्ते भांड यांना गौरविण्यात आले. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, परिषदेचे अध्यक्ष सुदाम भोरे, उद्योजक रंगनाथ गोडगे उपस्थित होते. थोरात म्हणाले, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेचे वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी संयोजकांनी अत्यंत संघर्षमय परिस्थितीतून यशस्वी झालेल्या व्यक्तींची निवड केली आहे. पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड ही त्या पुरस्काराची उंची वाढवते, असे थोरात म्हणाले. कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, जेष्ठ उद्योजक रंगनाथ गोडगे, मसापचे मुरलीधर साठे, मुकुंद आवटे, नागेश वासतकर, अरुण गराडे, जयवंत भोसले, सुनील उकिरडे, राजेंद्र वाघ, सुरेश कंक, प्रदीप गांधलीकर यांनी परिश्रम घेतले. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्तविक केले.
190721\img-20210718-wa0109.jpg
देवळाली प्रवराचे उद्योजक गणेश भांड यांना ना.थोरात यांच्या हस्ते भारतरत्न जे.आर.डी टाटा उद्योग विभूषण पुरस्कार प्रदान