दसरा मेळाव्यासाठी पंकजा मुंडे यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 22:22 IST2017-09-07T22:22:22+5:302017-09-07T22:22:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पाथर्डी (जि. अहमदनगर) : येत्या दसरा मेळाव्याला भगवानगडावर उपस्थित राहण्याचे साकडे कार्यकर्त्यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना मुंबईत भेटून घातले. परंतु यावर मुंडे यांच्याकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने ते मेळाव्याला येणार किंवा नाही याकडे लक्ष लागले आहे.

दसरा मेळाव्यासाठी पंकजा मुंडे यांना साकडे
ल ोकमत न्यूज नेटवर्क पाथर्डी (जि. अहमदनगर) : येत्या दसरा मेळाव्याला भगवानगडावर उपस्थित राहण्याचे साकडे कार्यकर्त्यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना मुंबईत भेटून घातले. परंतु यावर मुंडे यांच्याकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने ते मेळाव्याला येणार किंवा नाही याकडे लक्ष लागले आहे.स्व. खा. गोपीनाथ मुंडे यांनी गडाला प्रतिष्ठा मिळवून दिली असून, ते न चुकता दसरा मेळाव्याला हजर राहत. त्यांच्या निधनानंतर त्यांची कन्या पंकजा मुंडे यांनी काही काळ भगवानगडावर हजेरी लावली. परंतु मागील वर्षी गडाचे महंत व मुंडे यांच्यात येथील दसरा मेळाव्यावरून तणाव निर्माण झाला. त्यामुळे मुंडे यांना मेळावा गडाच्या पायथ्याला घ्यावा लागला. यावेळी मुंडे यांनी या मेळाव्याला उपस्थित राहून गडावर मेळावा घ्यावा, यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर, अमोल गर्जे, मुकुंद गर्जे, राहुल कारखेले आदींनी गुरुवारी मुंडे यांची मुंबईत भेट घेतली. मला गडावर राजकारण करायचे नाही, मेळावा घ्यायचा की नाही याबाबत आपण अद्याप निर्णय घेतलेला नाही, असे मुंडे यांनी कार्यकर्त्यांना सांगत त्यांची समजूत घातली. परंतु कार्यकर्ते मेळावा घेण्यावर ठाम होते. त्यामुळे आता मुंडे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.