बुळेपठारची भागेना तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 17:30 IST2019-05-11T17:30:39+5:302019-05-11T17:30:44+5:30
राहुरी तालुक्यातील दुर्गम भागातील बुळेपठार या गावात तीव्र पाणीटंचाई आहे़ येथे शासकीय टँकरने पाणीपुरवठा होत आहे़ प्रत्यक्षात मात्र या टँकरच्या माध्यमातून ग्रामस्थांची तहान भागत नाही़

बुळेपठारची भागेना तहान
सुभाष आंग्रे
म्हैसगाव: राहुरी तालुक्यातील दुर्गम भागातील बुळेपठार या गावात तीव्र पाणीटंचाई आहे़ येथे शासकीय टँकरने पाणीपुरवठा होत आहे़ प्रत्यक्षात मात्र या टँकरच्या माध्यमातून ग्रामस्थांची तहान भागत नाही़
बुळेपठार या गावची लोकसंख्या १३९ एवढी आहे़ शासकीय नियमानुसार प्रत्येक व्यक्तीस २० लिटर पाण्याचा हिशोब धरून दररोज दोन हजार पाचशे लिटर एवढे पाणी गृहीत धरून दिवसाआड पाच हजार लिटर पाणी दिले जाते़दिवसाआड होणाऱ्या टँकरच्या खेपा दररोज होणे गरजेचे आहे़ हे पाणी अपुरे पडत असल्याचे पाणी पुरवठा देखरेख समिती सदस्य सखूबाई दुधवडे यांनी सांगितले़