गड राखण्यासाठी सत्ताधाऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:11 IST2020-12-28T04:11:59+5:302020-12-28T04:11:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क करंजी : ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर होताच गावातील पुढाऱ्यांनी बैठका घेऊन मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. करंजी (ता.पाथर्डी) ...

The betting efforts of the authorities to maintain the fort | गड राखण्यासाठी सत्ताधाऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न

गड राखण्यासाठी सत्ताधाऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क

करंजी : ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर होताच गावातील पुढाऱ्यांनी बैठका घेऊन मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. करंजी (ता.पाथर्डी) परिसरात अनेक महत्त्वाच्या गावांच्या निवडणुका होत असल्याने परिसरातील अनेक मान्यवरांचा या निवडणुकीत कस लागणार आहे. अनेक गावांतील सत्ताधाऱ्यांना आपले गड राखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतील.

पाथर्डी तालुक्यात ७८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. करंजी परिसरातील घाटसिरस, सातवड, भोसे, खांडगाव-जोहारवाडी, लोहसर, कौडगाव-त्रिभुवनवाडी-निंबोडीसह अनेक राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे गावागावात बैठका व मोर्चेबांधणीस सुरुवात झाली आहे. या भागातील अनेक मान्यवरांना आपला गड राखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.

मागील पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत आणि यावर्षीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत या भागाच्या नेतृत्वात बदल झाल्याने मोठा फरक जाणवत आहे. मागील निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी या निवडणुकीत कंबर कसली आहे. या भागातील अनिल गिते, राजेंद्र पाठक, बंडू पाठक, संभाजीराव वाघ, पृथ्वीराज आठरे, रवी भापसे, मच्छिंद्र सावंत, सुरेश पवार, महादेव चव्हाण, संतोष चव्हाण, नवनाथ पाठक, दादासाहेब चोथे, पोपटराव चोथे, अशोक टेमकर, विलास टेमकर, प्रदीप टेमकर यांच्यासह अनेक लहान-मोठ्या कार्यकर्त्यांना आपल्या राजकीय अस्तित्वासाठी शर्थीने प्रयत्न करावे लागतील. मागील निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत तरुण इच्छुकांची संख्या जास्त असल्याने श्रेष्ठींची डोकेदुखी वाढणार असल्याने प्रत्येक वाॅर्डात तिरंगी-चौरंगी लढतीची शक्यता आहे.

.....

स्वखर्चावर निवडणूक

प्रथमच या निवडणुकीत सरपंचपदाचे आरक्षण निवडणूक झाल्यानंतर जाहीर होणार असल्याने अनेक उमेदवारांनी स्वखर्चावर निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे.

.....

तनपुरे-कर्डिले गटात चुरस

विधानसभा निवडणुकीनंतर या निवडणुकीत पुन्हा एकदा मंत्री प्राजक्त तनपुरे व माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे समर्थक आमने-सामने आले आहेत. यामुळे निवडणुका रंगतदार होणार आहेत.

Web Title: The betting efforts of the authorities to maintain the fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.