अडीच हजार हेक्टर क्षेत्राला एस्केप योजनेचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:28 IST2021-02-05T06:28:11+5:302021-02-05T06:28:11+5:30
पारनेर : पारनेर व शिरूर तालुक्यांतील नदीकाठच्या गावातील अडीच हजार हेक्टर क्षेत्राला ‘एस्केप’ योजनेचा लाभ होणार असल्याचे सांगतानाच पारनेर ...

अडीच हजार हेक्टर क्षेत्राला एस्केप योजनेचा लाभ
पारनेर : पारनेर व शिरूर तालुक्यांतील नदीकाठच्या गावातील अडीच हजार हेक्टर क्षेत्राला ‘एस्केप’ योजनेचा लाभ होणार असल्याचे सांगतानाच पारनेर तालुक्याच्या विकासाला निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही कामगार व राज्य उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे यांनी दिली.
पारनेर तालुक्यातील म्हस्केवाडी (भोकरी) येथील सुमारे सहा कोटी रुपये खर्चाच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे भूमिपूजन व कुकडी डावा कालवा चारी क्र.१३ मधील विमोचक बांधकामाचे उद्घाटन वळसे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. आमदार निलेश लंके अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार पोपटराव गावडे उपस्थित होते.
वळसे म्हणाले, जांबुत ते गाडीलगावपर्यंतचे कुकडी नदीवरील सर्व बंधारे विनाविलंब व पूर्ण क्षमतेने भरून देणार असून पारनेर व शिरूर तालुक्यांतील नदीकाठच्या अडीच हजार हेक्टर जमिनीसाठी एस्केप योजनेचा लाभ होणार आहे.
लंके म्हणाले, कामगारमंत्री वळसे पाटील यांचे पारनेर तालुक्यावर विशेष प्रेम असल्याने त्यांच्यामुळे पाटपाण्यासाठी तालुक्याला झुकते माप मिळते. कुकडीच्या पाण्याचे नियोजन करताना आवर्तन पंधरा दिवस अलीकडे लवकर आल्यास तुटवडा जाणवणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी म्हस्केवाडीचे सरपंच डॉ. किरण पानमंद, सावळा पानमंद, आनंद चौधरी, अरुण पवार, अनिल गंधाक्ते, गोविंद साबळे, संतोष काटे, बाळासाहेब पुंडे, सचिन साखला, विकी लंके, आकाश चौधरी, बाळासाहेब लंके, बंटी दाते, नूर कुरेशी, गणेश जाधव, प्रभाकर म्हस्के, जयदीप म्हस्के, समाधान म्हस्के, रोहन म्हस्के आदी उपस्थित होते.
फोटो : ३१ वळसे
म्हस्केवाडी (भोकरी) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे भूमिपूजन करताना मंत्री दिलीप वळसे, आमदार निलेश लंके व इतर.