ग्रामिण भागात शालेय पोषण आहार वाटपाने दिलासा लाभार्थ्यांना फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 13:52 IST2020-04-12T13:52:10+5:302020-04-12T13:52:24+5:30
पळवे : कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यकवस्तू आणण्यासाठी शहराकडे जाण्यासाठी ग्रामिण भागातून कोणतीही सुविधा नाही. शिवाय सर्वत्र बंद असल्याने सध्या ग्रामिण भागातील लोकांना जीवनावश्यक वस्तुंसाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.शिवाय ज्यांचे हातावरचे पोट आहे त्यांना संकटाना सामोरे जावे लागत आहे. अशातच शासन निर्णयानुसार शालेय पोषण अंतर्गत शाळेत शिल्लक असलेला तांदुळ व कडधान्य विद्यार्थ्यांना पालकांमार्फत वाटपाच्या निर्णयाने ग्रामिण भागाला मोठा दिलासा मिळाला आहे.

ग्रामिण भागात शालेय पोषण आहार वाटपाने दिलासा लाभार्थ्यांना फायदा
कानिफनाथ गायकवाड /
पळवे : कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यकवस्तू आणण्यासाठी शहराकडे जाण्यासाठी ग्रामिण भागातून कोणतीही सुविधा नाही. शिवाय सर्वत्र बंद असल्याने सध्या ग्रामिण भागातील लोकांना जीवनावश्यक वस्तुंसाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.शिवाय ज्यांचे हातावरचे पोट आहे त्यांना संकटाना सामोरे जावे लागत आहे. अशातच शासन निर्णयानुसार शालेय पोषण अंतर्गत शाळेत शिल्लक असलेला तांदुळ व कडधान्य विद्यार्थ्यांना पालकांमार्फत वाटपाच्या निर्णयाने ग्रामिण भागाला मोठा दिलासा मिळाला आहे.गेली पंधरा वीस दिवसांपासून ग्रामिण भागाचा शहरापासून संपर्कच तुटलेला दिसत आहे. आठवडे बाजार तर बंदच झाले आहेत.यामुळे जीवनावश्यक खाद्य पदार्थांचा तुटवडा काही अंशी जाणवत असताना शासनाच्या आदेशानुसार शाळेत मुलांना देण्यात येणारा तांदुळ तसेच कडधान्य सध्या शाळा बंद असल्याने शिलकीचा माल पालकांमार्फत वाटण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागाला याचा मोठ फायदा झाल्याचे दिसत आहे. पारनेर तालुक्यातील ९२ शाळांनी
अद्यापपर्यंत पोषण आहार वाटप केले आहे.उर्वरित शाळांचे वाटप सध्या सुरु असल्याची माहिती तालुका विस्तार अधिकारी संभाजी झावरे यांनी लोकमत शी बोलताना सांगितले. राहिलल्या शाळांनी शाळा स्तरावर शासकीय नियमांचे पालन करुन लवकरात लवकर .. तांदुळ वाटप करावेत असेही झावरे म्हणाले.