बेलवंडी पोलिसांकडून पिंपळगाव पिसा येथे दारु अड्डा उद्धवस्त,एकास अटक.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 14:37 IST2020-04-30T14:37:46+5:302020-04-30T14:37:54+5:30
विसापूर- पिंपळगाव पिसा (ता.श्रीगोंदा) येथे बेलवंडी पोलीसांनी गावठी दारू अड्डयावर छापा टाकून एका व्यक्तीला अटक केली. बेलवंडी ...

बेलवंडी पोलिसांकडून पिंपळगाव पिसा येथे दारु अड्डा उद्धवस्त,एकास अटक.
विसापूर- पिंपळगाव पिसा (ता.श्रीगोंदा) येथे बेलवंडी पोलीसांनी गावठी दारू अड्डयावर छापा टाकून एका व्यक्तीला अटक केली.
बेलवंडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली बेलवंडी पोलीसांनी बुधवार दि.२९ रोजी सकाळी नऊच्या सुमारास पिंपळगाव पिसा येथील हंगा नदीच्या तीरावर काटवानात गावठी दारू अड्डयावर छापा टाकला.यावेळी दारू तयार करण्याचे आठ हजार रुपये किंमतीचे रसायन व दोन हजाराची दारू पोलीसांनी हस्तगत केली.या वेळी दारू अड्डा चालवणारा अंकुश आण्णा पवार वय 33 रा पिंपळगाव पिसा याला अटक करण्यात आली.या बाबत पोलीस नाईक नंदकुमार मधुकर पठारे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास सहायक फौजदार बजरंग गवळी करत आहे.सध्या गेल्या महीनाभरा पासून लॉकडाऊन चालू असताना पिंपळगाव पिसा येथे दारुड्यांचा सुळसुळाट झाला होता.पोलीसांनी केलेल्या कारवाईचे समाधान व्यक्त करताना आणखी कठोर कारवाई करून गावातील दारू विक्रीला आळा घालावा अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.