पोलीस मित्र संघटनेच्या वतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:04 IST2021-01-08T05:04:08+5:302021-01-08T05:04:08+5:30

श्रीरामपूर : रेझिंग डेनिमित्त पोलीस मित्र संघटनेच्या वतीने येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय कार्यालय व तालुका, तसेच शहर ...

On behalf of the Police Friends Association | पोलीस मित्र संघटनेच्या वतीने

पोलीस मित्र संघटनेच्या वतीने

श्रीरामपूर : रेझिंग डेनिमित्त पोलीस मित्र संघटनेच्या वतीने येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय कार्यालय व तालुका, तसेच शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश निकम, डॉ. दिलीप शिरसाठ, के.के. आव्हाड, बाबासाहेब काळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपअधीक्षक संदीप मिटके, निरीक्षक आयुष नोपानी, निरीक्षक मसूद खान, निरीक्षक योगेश देशमुख, संभाजी पाटील, सहायक पोलीस निरीक्षक समाधान सुरवडे, कृष्णा घायवत, बी. बी. उजे, जीवन बोरसे, संजय कदम आदी अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी कोरोना संकटात जनतेचे रक्षण करताना मृत्युमुखी पडलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सुनील साळवे यांनी पोलीस मित्र संघटनेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.

सूत्रसंचालन दादासाहेब साठे यांनी केले. आभार भरत कुंकुलोळ यांनी मानले. यावेळी प्रमोद पत्की, प्रवीण साळवे, दिलीप महाजनी, बाळासाहेब सोनटक्के, सुरेश वाघुले, सुखदेव शेरे, किरण सोनवणे, प्रकाश जाधव, प्रतापराजे भोसले, विश्वास भोसले, सुनील शेळके, संतोष जाधव, विनीत कुंकुलोळ, शोभा शेंडगे, सविता साळुंके, उमेश अग्रवाल, बन्सी फेरवानी उपस्थित होते.

Web Title: On behalf of the Police Friends Association