लहुजी शक्ती सेनेच्यावतीने विविध क्षेत्रांतील मान्यवरांना पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:47 IST2021-09-02T04:47:14+5:302021-09-02T04:47:14+5:30
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कोरोना काळात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना जामखेड तालुका लहुजी शक्ती सेनेच्या वतीने ...

लहुजी शक्ती सेनेच्यावतीने विविध क्षेत्रांतील मान्यवरांना पुरस्कार प्रदान
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कोरोना काळात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना जामखेड तालुका लहुजी शक्ती सेनेच्या वतीने पुरस्कार देण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे, पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड होते. जामखेड पॉलिटेक्निकल कॉलेजचे प्राचार्य विकी घायतडक उपस्थित होते. यावेळी साहित्य पुरस्कार कवी बाळासाहेब शिंदे, कोरोना योध्दा पुरस्कार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे व समाजसेवक पुरस्कार पाटोदाचे माजी संरपच गफ्फार पठाण, नानाभाऊ वाल्हेकर, सुनील सकट, आदर्श पत्रकार पुरस्कार संजय वारभोग, समीर शेख यांना देण्यात आहे. यावेळी कार्यक्रमाचे आयोजन लहुजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष पोपटराव फुले यांनी केले होते.
ओळी- लहुजी शक्ती सेनेच्या वतीने समाजभूषण पुरस्काराने सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना सन्मानित करताना पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, समवेत प्राचार्य विकी घायतडक.