गोदावरी दूध संघाच्यावतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:26 IST2021-06-09T04:26:31+5:302021-06-09T04:26:31+5:30

कोपरगाव : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गोदावरी खोरे दूध संघ व राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड यांच्यावतीने वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. ...

On behalf of Godavari Dudh Sangh | गोदावरी दूध संघाच्यावतीने

गोदावरी दूध संघाच्यावतीने

कोपरगाव : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गोदावरी खोरे दूध संघ व राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड यांच्यावतीने वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला.

दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे व कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली संघाच्या कार्यक्षेत्रातील संवत्सर परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. लिंब, पिंपळ, चिंच, वड, नारळ व इतर पर्यावरणाला पूरक अशा विविध झाडांची रोपे यावेळी लावण्यात आली. निसर्गाला हानिकारक ठरणारे प्लास्टिक व कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.

डेअरी विकास बोर्डाचे प्रकल्प समन्वयक डॉ. चंद्रकांत धंदर व त्यांच्या सहकाऱ्यांनी यात सहभाग घेतला. माझी वसुंधरा अभियान यशस्वी होण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने या अभियानामध्ये सहभागी होण्याची नितांत गरज आहे. भविष्यातील नैसर्गिक आपत्ती व पर्जन्यमान विचारात घेता, आज झाडे लावण्याची व त्यांचे संवर्धन करण्याची गरज असल्याचे मत राजेश परजणे यांनी व्यक्त केले.

-------

Web Title: On behalf of Godavari Dudh Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.