नागवडे कारखान्याच्या संचालकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:16 IST2021-06-26T04:16:01+5:302021-06-26T04:16:01+5:30

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील रहिवासी असलेले सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे साखर कारखान्याचे संचालक सचिन कदम यांच्यावर ...

Beating of Nagwade factory director | नागवडे कारखान्याच्या संचालकाला मारहाण

नागवडे कारखान्याच्या संचालकाला मारहाण

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील रहिवासी असलेले सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे साखर कारखान्याचे संचालक सचिन कदम यांच्यावर मंगळवारी सायंकाळी कुताळ मळा शिवारात दोन अज्ञात इसमांनी हल्ला करून त्यांना मारहाण केली. याबाबत कदम यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

कदम हे मंगळवारी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास कदम वस्तीवरून कुताळ मळा येथे पाहुण्यांकडे मोटारसायकलवरून जात होते. कुताळ मळा येथील बंधाऱ्याजवळ त्यांना मोटारसायकलवरून येणाऱ्या दोन अनोळखी लोकांनी अडवून अचानक मारहाण व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. कदम यांनी इसम लूटमार करणारे असावेत असे समजून जवळ असणारे वीस हजार रुपये देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या लोकांनी ते पैसे फेकून दिले व त्यांना दमदाटी करून निघून गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Beating of Nagwade factory director