उपचारांचे पक्के बिल मागितल्याने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:25 IST2021-06-09T04:25:55+5:302021-06-09T04:25:55+5:30
डॉ. वाणी हॉस्पिटलमधील डॉ. प्रतीक वाणी, नर्स मनिषा, मेडिकलवाले वामन (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) या तिघांविरोधात संकेत रामनाथ ...

उपचारांचे पक्के बिल मागितल्याने मारहाण
डॉ. वाणी हॉस्पिटलमधील डॉ. प्रतीक वाणी, नर्स मनिषा, मेडिकलवाले वामन (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) या तिघांविरोधात संकेत रामनाथ खतोडे (वय १८, रा. राजापूर, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संकेत खतोडे यांची आजी सुमन मारुती खतोडे यांच्यावर वाणी हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे उपचार सुरू होते. ७ मे ला त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यानंतर सर्व विधी आटोपून खतोडे हे ७ जूनला डॉक्टरांनी आजीवर केलेल्या उपचारांचे उर्वरित बिल भरण्यासाठी वाणी हॉस्पिटलमध्ये गेले होते. ‘शासकीय नियमानुसार ऑडिट करून माझ्या आजीवर केलेल्या उपचाराचे जे बिल निघेल, ते बिल मी आता भरण्यास तयार आहे. तरी तुम्ही सर्व पक्की बिले द्या. तसेच एकूण बिलाचा आकडा सांगा.’ असे खतोडे हे डॉक्टरांना म्हणाले. याचा राग येऊन डॉक्टर वाणी, नर्स मनिषा, मेडिकलवाले वामन यांनी खतोडे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. ‘तुमची बिल भरण्याची लायकी नाही, तुम्ही येथून निघून जा’ असे म्हणत ढकलून दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.