घारगाव : शेतात तणनाशक फवारणी करण्याच्या वादातून एकमेकांना मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी (दि.५) सकाळी साडे बारा वाजलेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील पठारभागातील शिंदोडी येथे घडली. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात दोन परस्परविरोधी आठ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जयश्री विठ्ठल नाईकवाडी (वय २७, रा.शिंदोडी ता.संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, द्वारका शिवराम घुले, तानाजी पंढरीनाथ घुले, शिवाजी पंढरीनाथ घुले व शिवाजी यांचा मुलगा (नाव माहित नाही), (सर्व रा. सावरगाव घुले ता.संगमनेर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी फिर्याद, द्वारका शिवराम घुले (वय ३९, रा. सावरगाव घुले ता.संगमनेर) यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जनाबाई सीताराम नाईकवाडी, जया विठ्ठल नाईकवाडी, बाळू विठोबा नाईकवाडी, सोपान लहानु नाईकवाडी (सर्व रा. शिंदोडी ता. संगमनेर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल डी.एस.वायाळ हे करीत आहेत.