खबरदार.. दारूच्या नशेत वाहने चालवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:33 IST2021-02-05T06:33:35+5:302021-02-05T06:33:35+5:30

बोधेगाव (ता. शेवगाव) येथील रेणुकामाता बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अ.नगर आणि श्रीरामपूर यांचे संयुक्त विद्यमाने केदारेश्वर ...

Be careful .. do not drive under the influence of alcohol | खबरदार.. दारूच्या नशेत वाहने चालवू नका

खबरदार.. दारूच्या नशेत वाहने चालवू नका

बोधेगाव (ता. शेवगाव) येथील रेणुकामाता बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अ.नगर आणि श्रीरामपूर यांचे संयुक्त विद्यमाने केदारेश्वर साखर कारखाना येथे सोमवारी (दि.१) ३२ व्या रस्ते सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आश्विनकुमार घोळवे, प्रमुख पाहुणे म्हणून आरटीओ दीपक पाटील हे उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी रक्तदान शिबिरही घेण्यात आले. यामध्ये ३५ जणांनी रक्तदान केले. कार्यक्रमासाठी केदारेश्वरचे प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे, संचालक त्रिंबक चेमटे, रेणुकामाता संस्थेचे अध्यक्ष राकेश गर्जे, मुख्य लेखापाल तीर्थराज घुंगरड, प्रशासकीय अधिकारी पोपटराव केदार, संगणक अभियंता भगवान सोनवणे, शेतकी अधिकारी अभिमन्यू विखे, शरद सोनवणे, मुख्याध्यापिका प्रतिभा गर्जे, प्रकाश गर्जे, राजेंद्र केसभट, संजय ढाकणे, अंबादास दहिफळे उपस्थित होते. प्रास्ताविक प्रतिभा गर्जे यांनी केले. आभार रमेश गर्जे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयुब शेख, उद्धव नलावडे, विनोद पवार, जैनुद्दीन शेख, अमोल शिरसाट आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Be careful .. do not drive under the influence of alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.