बंदी घातलेला पान मसाला, तंबाखू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:16 IST2021-06-25T04:16:13+5:302021-06-25T04:16:13+5:30

१६ हजार २० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जाकीर युसूफ पठाण (वय ३४, रा. ऑरेंज कॉर्नर, संगमनेर) असे गुन्हा ...

Banned paan masala, tobacco confiscated | बंदी घातलेला पान मसाला, तंबाखू जप्त

बंदी घातलेला पान मसाला, तंबाखू जप्त

१६ हजार २० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जाकीर युसूफ पठाण (वय ३४, रा. ऑरेंज कॉर्नर, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल सचिन उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

राज्यात प्रतिबंधित पदार्थ विक्री बंदी असताना जाकीर पठाण हा चहाच्या टपरीतून अवैधरीत्या पान मसाला व सुगंधी तंबाखू विक्री करीत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख यांना समजली. त्यांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले असता, शहर पोलिसांच्या पथकाने सह्याद्री टी हाऊस येथे छापा टाकला. या छाप्यात १६ हजार ५० रुपये किमतीचा पान मसाला व सुगंधी तंबाखू आढळून आला. हा सर्व मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले या अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Banned paan masala, tobacco confiscated