रेंज नसल्यामुळे बँकेचे कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:24 IST2021-09-06T04:24:34+5:302021-09-06T04:24:34+5:30

खर्डा : ओएफसी बीएसएनएल ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शनला रेंज नसल्यामुळे येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया या शाखेचे कामकाज मागील चार ...

Bank's operations stalled due to lack of range | रेंज नसल्यामुळे बँकेचे कामकाज ठप्प

रेंज नसल्यामुळे बँकेचे कामकाज ठप्प

खर्डा : ओएफसी बीएसएनएल ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शनला रेंज नसल्यामुळे येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया या शाखेचे कामकाज मागील चार दिवसांपासून ठप्प झाले आहे.

ग्रामीण भागातील आर्थिक कणा असणाऱ्या खर्डा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत ब्रॉडबँड बीएसएनएलचे ओएफसी कनेक्शन आहे. मात्र, रेंज नसल्यामुळे बँकेचा कारभार मागील चार दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारण्याची वेळ येऊन मनस्ताप सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांचा प्रमुख सण बैलपोळा, गौरी-गणपती हे सण जवळ आलेले असल्याने शेतकऱ्यांची खरेदीसाठी लगबग सुर झाली आहे. परंतु बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता मागील तीन दिवसांपासून बँकेत रेंज नसल्यामुळे व्यवहार ठप्प झाले. लोकांना पैसे काढणे व टाकणे अवघड झाले. बँकेचा कारभार ऑनलाइन झाल्यामुळे सध्या ओएफसी ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन बंद असल्यामुळे बँकेचा कारभार करताना अडचणी येतात. वरिष्ठ कार्यालय व भारत संचार निगम अशा दोन्ही कार्यालयांस माहिती कळवली आहे. ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन चालू झाल्यावर कारभार सुरळीत होईल, असे बँकेचे शाखाधिकारी मुकेश खोडके यांनी सांगितले.

Web Title: Bank's operations stalled due to lack of range

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.