पाचेगावात नेट कनेक्टिव्हिटीअभावी बँकेचे व्यवहार ठप्प
By | Updated: December 6, 2020 04:21 IST2020-12-06T04:21:54+5:302020-12-06T04:21:54+5:30
पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील युनियन बँकेची एकमेव राष्ट्रीयीकृत बँक शाखा आहे. या शाखेत गेल्या आठ दिवसांपासून नेट ...

पाचेगावात नेट कनेक्टिव्हिटीअभावी बँकेचे व्यवहार ठप्प
पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील युनियन बँकेची एकमेव राष्ट्रीयीकृत बँक शाखा आहे. या शाखेत गेल्या आठ दिवसांपासून नेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे शाखेतील खातेधारकांचे दैनंदिन व्यवहार पूर्णतः ठप्प पडले आहेत.
युनियन बँकेच्या येथील शाखेत जवळपास अकरा हजार नागरिकांची खाती आहेत. या परिसरात या बँकेची एकमेव राष्ट्रीयीकृत शाखा असून निंभारी, गोणेगाव, बेलपिंपळगाव, इमामपूर, पुनतगाव, घोगरगाव, नेवासा बुद्रूक, चिंचबन, खुपटी आदींसह श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी, गुजरवाडी, टाकळीभान तसेच राहुरी तालुक्यातील तिळापूर, वांजूळपोही आदी गावांतील नागरिकांची या बँकेत खाती आहेत.
निराधार, परित्यक्ता, वयोवृद्ध महिलांचे अनुदान, शालेय विद्यार्थ्यांचे अनुदान, शेतकऱ्यांचे अनुदान याच बँकेत जमा होत असते. तसेच व्यापारी, उद्योजक यांच्याही मोठ्या प्रमाणात व्यवहार येथूनच चालतात. सध्या बँकेचे महत्त्वाचे दैनंदिन कामकाज श्रीरामपूर शाखेतून सुरू असून खातेदारांचे व्यवहार मात्र पूर्णतः ठप्प आहेत. बँकेच्या कामकाजाच्या वेळेबाबतीतही अनेक नागरिकांच्या तक्रारी असून दुपारी तीननंतर बँकेचा मुख्य दरवाजा अधिकारी बंद करतात. असे बहुतेक खातेधारकांचे म्हणणे आहे. या कारणामुळे बँकेच्या खातेदारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.