कोपरगाव शहरातून वाळू वाहतुकीस बंदी
By Admin | Updated: June 5, 2016 23:38 IST2016-06-05T23:32:24+5:302016-06-05T23:38:08+5:30
कोपरगाव : कोपरगाव शहरातून वाळू वाहतूक होणार नाही, त्यासाठी संभाजी चौक व डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पोलीस पॉर्इंट उभारण्यात येईल़

कोपरगाव शहरातून वाळू वाहतुकीस बंदी
कोपरगाव : कोपरगाव शहरातून वाळू वाहतूक होणार नाही, त्यासाठी संभाजी चौक व डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पोलीस पॉर्इंट उभारण्यात येईल़ वाळू वाहतूक झाल्यास महसूल पथक त्यांच्यावर गौण खनिज कायद्यान्वये कारवाई करेल, असे लेखी आश्वासन तहसीलदार प्रशांत खेडेकर यांनी दिले़ त्यामुळे सोमवारपासून शिवसेनेने आयोजित केलेले बेमुदत उपोषण स्थगित करण्यात आले आहे़
कोपरगाव शहरातून राजरोस अवैध वाळूची वाहतूक डंपरद्वारे होत आहे़ मागील आठवड्यात डंपरखाली चिरडून एका वृद्ध इसमाचा मृत्यू झाला़ या शिवाय नव्यानेच तयार झालेले रस्ते खराब होऊ लागले़ पाईपलाईन लिकेज होण्याचे प्रमाणही वाढले़ त्यामुळे वाळूची वाहतूक शहरातून बंद करावी, या मागणीसाठी शिवसेनेने दि़ ६ जूनपासून डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर बेमुदत उपोषण करण्याचे ठरविले होते़ परंतु शनिवारी सायंकाळी तहसीलदार प्रशांत खेडकर, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी सेना पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून लेखी आश्वासन दिले़ त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले़
याबाबत पत्रकारांशी बोलताना माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे म्हणाले, सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते वाळू व्यवसायात उतरले आहेत़ आडमाप पैसा, स्थानिक पुढारी, प्रशासन यांच्या आशीर्वादामुळे वाळू तस्करांची मुजोरी वाढली आहे़ त्यामुळे सर्वसामान्य नागरिक सुरक्षित राहिला नाही़ जनता आमच्याबरोबर आली आणि त्यातून वरील चांगला निर्णय झाला़ यावेळी उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव, तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, शहरप्रमुख भरत मोरे, उपशहर प्रमुख असलम शेख, महेमुद सय्यद, सलिम पठाण आदींची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)