मुख्याध्यापक संघाच्या तालुकाध्यक्षपदी बाळासाहेब वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:14 IST2021-03-29T04:14:33+5:302021-03-29T04:14:33+5:30

कर्जत : कर्जत तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी बाळासाहेब वाघ यांची, तर सचिवपदी कैलास काकडे यांची बिनविरोध निवड झाली. ...

Balasaheb Wagh as the Taluka President of the Headmasters' Association | मुख्याध्यापक संघाच्या तालुकाध्यक्षपदी बाळासाहेब वाघ

मुख्याध्यापक संघाच्या तालुकाध्यक्षपदी बाळासाहेब वाघ

कर्जत : कर्जत तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी बाळासाहेब वाघ यांची, तर सचिवपदी कैलास काकडे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी तालुक्यातील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

तालुका मुख्याध्यापक संघाचे मावळते अध्यक्ष दत्ता भांडवलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. ही बैठक कर्जत येथे महात्मा गांधी विद्यालयात पार पडली. यावेळी मुख्याध्यापकांच्या विविध समस्यांवर चर्चा झाली. नूतन पदाधिकारी असे : अध्यक्ष- बाळासाहेब वाघ, उपाध्यक्ष- दिलीप खंडागळे, जयश्री गाडे, पुष्पा सोनवणे. सचिव- कैलास काकडे, सहसचिव- कांतीलाल तनपुरे, महादेव चांडे. कोषाध्यक्ष- अभिमन्यू बेरगळ. प्रसिद्धी प्रमुख- कय्यूम मोमीन.

यावेळी बापूसाहेब काळदाते, सूर्यभान सुद्रिक, तात्यासाहेब वडवकर, राम पाटील, सुनील मुरकुटे, दीपक भोसले, सुधाकर गांगर्डे, त्रिंबक निकत आदी उपस्थित होते.

---

२८बाळासाहेब वाघ, २८ कैलास काकडे

Web Title: Balasaheb Wagh as the Taluka President of the Headmasters' Association