बाळासाहेब थोरात मुंबईतच तळ ठोकून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 12:15 IST2019-11-23T12:14:34+5:302019-11-23T12:15:24+5:30
राज्यात अनेक घडामोडी घडत असून कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात हे मुंबईत आहेत. असे त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क केल्यानंतर सांगण्यात आले.

बाळासाहेब थोरात मुंबईतच तळ ठोकून
संगमनेर : राज्याच्या राजकारणात शनिवारी मोठा राजकीय भूंकप झालेला पहायला मिळाला. यानंतर राज्यात अनेक घडामोडी घडत असून कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात हे मुंबईत आहेत. असे त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क केल्यानंतर सांगण्यात आले.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शनिवारी पहाटे अचानक राष्ट्रपती राजवट उठवून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. या राजकीय भूंकपावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. याबाबत कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांना संपर्क केला असता तो होवू शकला नाही. दरम्यान, संगमनेर शहर तसेच संगमनेर तालुक्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघाला जोडल्या गेलेल्या गावांमध्ये आमदार राधाकृष्ण विखे यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष साजरा केला.