अहमदनगर : ओम उद्योग समुहाचे अध्यक्ष, मढी देवस्थानचे विश्वस्त बाळासाहेब पवार यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, एक बहिण असा परिवार आहे.मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनात पवार यांनी मोठा पुढाकार घेतला होता़ क्रीडा मार्गदर्शक म्हणूनही पवार यांचे काम उल्लेखनीय आहे. माळीवाडा येथील कपिलेश्वर देवस्थान विश्वस्त, मढी देवस्थानचे कोषाध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघाचे शहराध्यक्ष, अहमदनगर जिल्हा मराठा समाज सेवा मंडळाचे कोषाध्यक्ष, मंगल कार्यालय व लॉन्स् असोसिएशनचे कोषाध्यक्ष, रामनारायण सामाजिक मंडळाचे सचिव, पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशा विविध पदांवर पवार यांनी आपल्या कामाचा ठसा उटविला आहे.
नगरमधील उद्योजक बाळासाहेब पवार यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 13:30 IST