या आंदोलनात बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिसाळ, शहर जिल्हाध्यक्ष शिवाजी भोसले, बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र करंदीकर, बाळासाहेब पातारे, मनोहर वाघ, गणेश चव्हाण, राधेलाल नकवाल, किरण सोनवणे, सुधीर खरात, हभप घुगे महाराज, अजय साळवे, प्रताप सौदे, जहीर सय्यद, सागर ठाणगे, यश साळवे, कन्हैय्या गट्टम, बी.आर. गोहेर, दादाभाऊ पटेकर, हनिफ शेख, कानिफ आंबेडकर आदी सहभागी झाले होते.
जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. आंदोलकांनी केंद्र व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून दुचाकी व रिक्षांना धक्का देत शहरातून मोर्चा काढला. माळीवाडा येथे महात्मा फुले व मार्केटयार्ड चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळविण्यात आला.
२०१४ पासून केंद्रात सत्तेत आलेल्या भाजपा सरकारच्या काळात सतत महागाई वाढत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढले असून, सर्वसामान्यांना जगणे अवघड झाले आहे. त्यात पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमतीचा भडका उडाला आहे. यात सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर कमी करावेत, खाद्यतेल तसेच जीवनावश्यक खाद्यपदार्थांचे दर कमी करावे, वीज बिल माफ करावे, आदी मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या.
फोटो -१५ आंदोलन
ओळी- महागाई वाढल्याने बहुजन मुक्ती पार्टीच्यावतीने नगरमध्ये धक्का मारो आंदोलन केले.