ढवळगाव-मेंगलवाडी रस्त्याची पावसामुळे दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:20 IST2021-09-13T04:20:49+5:302021-09-13T04:20:49+5:30

देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव मेंगलवाडी मार्गे राजापूर रस्त्याची पावसामुळे अतिशय दुरवस्था झाली असून या मार्गावर प्रवास करणे धोक्याचे ...

Bad condition of Dhawalgaon-Mengalwadi road due to rains | ढवळगाव-मेंगलवाडी रस्त्याची पावसामुळे दुरवस्था

ढवळगाव-मेंगलवाडी रस्त्याची पावसामुळे दुरवस्था

देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव मेंगलवाडी मार्गे राजापूर रस्त्याची पावसामुळे अतिशय दुरवस्था झाली असून या मार्गावर प्रवास करणे धोक्याचे झाले आहे.

हा रस्ता मेंगलवाडी, राजापूर नं १, राजापूर नं २, शेळकेवाडी, कोल्हेवाडी या सर्व गावांना ढवळगावमध्ये राज्यमार्ग क्रमांक ५० ला जोडला जात असल्याने हा रस्ता वरील सर्व गावांना तालुक्याशी आणि जिल्ह्याशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे.

या गावातील अनेक लोकांचा दुग्ध व्यवसाय, सरकारी व्यवसाय असल्याने शेतकऱ्यांना यामार्गे जोखीम पत्करून प्रवास करणे नित्याचेच बनले आहे. या मार्गावर अनेक वेळा गाड्या घसरून लोक जखमी झाले आहेत. वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तरी प्रशासनाने या प्रकरणी लक्ष घालून लवकरात लवकर या रस्त्याचे काम करावे, अशी मागणी सरपंच प्रतीक्षा धनंजय मेंगवडे व ग्रामस्थांनी केली आहे.

----

फोटो आहे

Web Title: Bad condition of Dhawalgaon-Mengalwadi road due to rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.