महापौरांसह भाजपा नगरसेवकांची अभिवादनाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:35 IST2020-12-13T04:35:18+5:302020-12-13T04:35:18+5:30

अहमदनगर : शहर भाजपातर्फे शनिवारी गांधी मैदान येथील भाजप कार्यालयात राष्ट्रीय नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात ...

Back to the greetings of BJP corporators including the mayor | महापौरांसह भाजपा नगरसेवकांची अभिवादनाकडे पाठ

महापौरांसह भाजपा नगरसेवकांची अभिवादनाकडे पाठ

अहमदनगर : शहर भाजपातर्फे शनिवारी गांधी मैदान येथील भाजप कार्यालयात राष्ट्रीय नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, सभागृह नेते मनोज दुलम यांच्यासह भाजप नगरसेवकांनीही पाठ फिरवली. त्यामुळे पक्षाचे ज्येष्ठ नेते अभय आगरकर, वसंत लोढा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच माजी खासदार दिलीप गांधी यांच्याही समर्थकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.

नगर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गांधी मैदान येथील भाजपा कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे, प्रदेश सदस्य अ‍ॅड. अभय आगरकर, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, सुनील रामदासी, उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, जिल्हा सरचिटणीस महेश नामदे, वसंत राठोड, सचिन पारखी, अजय चितळे, महेश तवले, तुषार पोटे, बाळासाहेब गायकवाड, ज्ञानेश्‍वर धिरडे, अर्जुन लाड, किशोर कटोरे, ऋग्वेद गंधे, सिद्धार्थ नाकाडे, राहुल कवडे, शिवाजी दहिंडे आदी उपस्थित होते.

यावेळी शहर भाजपाचे अध्यक्ष भय्या गंधे म्हणाले, महाराष्ट्रात भाजपाची सत्ता नसतानाही व कुठल्याही मोठ्या पदावर नसतानाही स्व. गोपीनाथ मुंडे यांनी भाजपाचे स्टार प्रचारक म्हणून मोठी ख्याती मिळविली. ऊसतोड कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी आयुष्यभर लढा दिला. आठरापगड जातींना एकत्र करून न्याय देण्याचेही काम त्यांनी केले आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांनी दाखविलेल्या मार्गावर जाऊनच काम करत आहेत. मुंडे यांची तळगाळातील लोकांसाठी केलेले कार्य यापुढेही पक्षाच्या माध्यमातून सुरू ठेवू.

याप्रसंगी सुनील रामदासी, वसंत लोढा, सचिन पारखी, अनिल गट्टाणी, तुषार पोटे आदींनी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या नगरमधील आठवणींना उजाळा दिला. सूत्रसंचालन महेश नामदे यांनी केले तर आभार तुषार पोटे यांनी मानले. यावेळी कैलास गर्जे, नितीन शेलार, अनिल सबलोक, पंकज जहागीरदार, नरेश चव्हाण, सुजित खरमाळे, साहिल शेख, आदेश गायकवाड, लक्ष्मीकांत तिवारी, अनिल गट्टाणी, सुधीर मंगलाराप, राम वडागळे, अमोल निस्ताने, चंद्रकांत पाटोळे, सुमित बटुळे, सुबोध रसाळ, शैलेंद्र ओहोळ, आशिष अनेचा, किरण जाधव, हुजेफा शेख, प्रणव सरनाईक आदी उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक एल. जी. गायकवाड यांना भाजपच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

दरम्यान, महापौर, नगरसेवक कार्यक्रमाला आले नसल्याने उपस्थितांमध्येही नाराजीचा सूर उमटला. विशेष म्हणजे एकही महिला पदाधिकारी किंवा कार्यकर्तीही कार्यक्रमाला नसल्याने मुंडे यांना मानणाऱ्यांमध्ये संताप उमटला.

----

भारतीय जनता पक्षाच्या सुरुवातीच्या काळापासून स्व.गोपीनाथ मुंडे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. पक्षाची ध्येये-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या अपार मेहनतीमुळेच राज्यातही आणि देशातही भाजपाची सत्ता आली होती. त्यांच्या या कार्याची प्रत्येक कार्यकर्त्याला जाणीव असणे गरजेचे आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. महापौरांसह पदाधिकारी, नगरसेवक यांनी अभिवादन कार्यक्रमाला येणे आवश्यकच होते.

-अभय आगरकर, सदस्य, प्रदेश भाजप

--------------

पक्षाच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येकाने आले पाहिजे. पक्षात काम करताना कोणीच लहान-मोठा नसतो. त्यामुळे नगरसेवक आले काय किंवा नाही आले याचा आम्हाला काही फरक पडत नाही. कोणापुढे झुकणारा नाही म्हणूनच पक्षाने मला अध्यक्ष केले आहे.-भय्या गंधे, शहराध्यक्ष, भाजप

---

फोटो- १० नगर भाजप

स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त शहर भाजपच्या वतीने गांधी मैदान येथील भाजप कार्यालयात अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहराध्यक्ष भय्या गंधे, अभय आगरकर, वसंत लोढा, सुनील रामदासी, सचिन पारखी, नरेंद्र कुलकर्णी आदी.

Web Title: Back to the greetings of BJP corporators including the mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.