संजीवनी अभियांत्रिकीतून बी. टेक. ऑनर्स पदवी देण्यात येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:40 IST2021-02-05T06:40:27+5:302021-02-05T06:40:27+5:30
कोल्हे म्हणाले, विद्यार्थ्यांना भविष्यात नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान समावेशक अभ्यासक्रम शिकविणे व काळानुरूप तो अपडेट करणे हा ...

संजीवनी अभियांत्रिकीतून बी. टेक. ऑनर्स पदवी देण्यात येणार
कोल्हे म्हणाले, विद्यार्थ्यांना भविष्यात नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान समावेशक अभ्यासक्रम शिकविणे व काळानुरूप तो अपडेट करणे हा मुख्य गाभा आहे. उत्कृष्ट अभ्यासक्रम ठरविण्यासाठी उद्योग जगत, शिक्षण, आयआयटीमधील तज्ज्ञ व्यक्ती व संस्थेचे माजी विद्यार्थ्यांची समिती तयार करून नव्या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. आयआयटी, एनआयटी., आयआयएम, एचबीएस आदी संस्थांप्रमाणे राष्ट्रीय आणि जागतिकस्तरावरील अभ्यासक्रम यापुढे शिकविले जाणार आहेत. उद्योग जगताच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांमध्ये विशेष कौशल्ये विकसित केली जाणार आहेत. याचप्रमाणे रोजगार क्षमता वाढीसाठी आणि उद्योजक होण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आता विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवी पूर्ण केल्यावर बी. टेक. / बी. टेक. ऑनर्स व पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यावर एम. टेक. ही पदवी मिळणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात पर्यावरण जागृती, अर्थशास्र, अकौंटन्सी असे विषय नव्हते. मात्र, इंजिनिअर झालेल्या विद्यार्थ्यांना या विषयांचेही ज्ञान आवश्यक असते. त्याचप्रमाणे इंग्रजी संभाषण व लेखन सुधारण्यासाठी इंग्रजी विषयाचाही समावेश करण्यात आला आहे.