आयुर्वेदिक डॉक्टरांना एमएस करण्यास विरोध
By | Updated: December 7, 2020 04:14 IST2020-12-07T04:14:52+5:302020-12-07T04:14:52+5:30
सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने राजपत्र प्रकाशित केले. त्यात आयुर्वेदिक पदवी घेणाऱ्यांना शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण देऊन जनरल सर्जरी, मूत्ररोग, पोट, ...

आयुर्वेदिक डॉक्टरांना एमएस करण्यास विरोध
सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने राजपत्र प्रकाशित केले. त्यात आयुर्वेदिक पदवी घेणाऱ्यांना शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण देऊन जनरल सर्जरी, मूत्ररोग, पोट, तसेच कान, नाक, घसा, नेत्र, दंत शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली. त्याचा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत निषेध केला.
यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. रवींद्र कुटे, डॉ. मनोज संचेती, डॉ. संकेत मुंदडा, डॉ. सचिन पऱ्हे, डॉ. संजय अनारसे, डॉ. अजित देशपांडे, डॉ. दिलीप शिरसाठ आदी उपस्थित होते.
डॉ. कुटे म्हणाले, आयुर्वेद हे महान शास्त्र आहे. या शास्त्रात शिक्षण घेणाऱ्या बांधवांनी त्याच शास्त्रात वैद्यकीय सेवा केली पाहिजे. ॲलोपॅथीच्या शास्त्रात सर्जन होण्याआधी साडेचार वर्षांचा एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. त्यात शरीर रचनाशास्त्र, शरीरक्रिया शास्त्र, बायोकेमिस्ट्री, पॅथॉलॉजी आदींचा प्रात्यक्षिकासह अभ्यास शिकविला जातो. आयुर्वेदाच्या पदवीपूर्व अभ्यासात केवळ त्याचेच मूलभूत विषय शिकविले जातात. त्यानंतर तीन वर्षे शस्त्रक्रिया शास्त्र शिकवले जाते. या कालावधीत शेकडो शस्त्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो व पदवी दिली जाते. मात्र, नव्या निर्णयामुळे रुग्णांना अभ्यासपूर्ण दर्जेदार उपचार मिळणार नाहीत. या प्रस्तावित अभ्यासक्रमानंतर त्यांना एमएस पदवी दिली जाणार आहे. त्याला इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध केला आहे.
मेडिकल असोसिएशनच्या वतीने ८ डिसेंबर रोजी निदर्शने केली जाणार आहेत. ११ डिसेंबर रोजी अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सोडून बंद पाळला जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.